मुंबई: सोमवारी मुंबईत लस घेतल्यानंतर एका 65 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला. मुंबई शहरातील ही पहिली घटना आहे जिथे लस घेतल्यानंतर लगेचच मृत्यू झाला आहे.
पालिका आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, वृद्धांचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानंतरच मृत्यूचे खरे कारण काय आहे हे कळेल.
सोमवारी 65 वर्षांचे नेगी लसी घेण्यासाठी अंधेरी पश्चिम येथील मिल्लत डायलिसिस सेंटरमध्ये पोहोचले. लस घेतल्यानंतर लगेचच ते बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले, मात्र संध्याकाळी 5 वाजता त्यांचा मृत्यू झाला.
पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमरे यांनी या बातमीला दुजोरा देत सांगितले की, या व्यक्तीला मधुमेहासह इतर आजार होते. आता त्याच्या मृत्यूमागील कारण लस आहे किंवा आजार हे तपासानंतरच कळेल. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर हा अहवाल एईएफआय समितीसमोर ठेवला जाईल, त्यानंतर समिती निर्णय घेईल.
-----------------------------
(संपादन- पूजा विचारे)
65 year old man died after being vaccinated in Mumbai on Monday
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.