Mumbai : राज्यात 655 परदेशी नागरिक कैदी; मुंबईत आर्थर रोड कारागृहात सर्वात जास्त 238 परदेशी नागरिक कैदी

महाराष्ट् राज्यातील कारागृहात सध्या एकूण 655 परदेशी नागरिक विविध गुन्ह्यासाठी कैदी बनून तुरुंगवास भोगत आहेत
655 foreign national prisoners in state 238 foreign national inmates at arthur road jail in mumbai
655 foreign national prisoners in state 238 foreign national inmates at arthur road jail in mumbaiSakal
Updated on

Mumbai News: महाराष्ट् राज्यातील कारागृहात सध्या एकूण 655 परदेशी नागरिक विविध गुन्ह्यासाठी कैदी बनून तुरुंगवास भोगत आहेत. आकडेवारीनुसारं एकूण 655 परदेशी कैद्यामध्ये 544 पुरुष कैदी, 110 महिला आणि एक तृतीयपंथी नागरिकाचा समावेश आहे.

मुंबईच्या आधीच खचाखच भरलेल्या आर्थर रोड कारागृहात 238 परदेशी नागरिक कैदी आहेत, त्यात खटल्याधिन असलेल्या परदेशी नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.यात चार दोषी ठरलेले आणि 234 हे अंडरट्रायल परदेशी कैदी म्हणून दाखल आहेत.चिंताजनक बाब आर्थर रोड कारागृहात आधीच क्षमतेपेक्षा अधिक कैदी असून त्यात वैद्यकीय सुविधाचा अभाव आहे,

विविध देशातील नागरिक

राज्याच्या तुरुंग विभागाच्या माहितीनुसार, 655 परदेशी नागरिक कैदी इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, कोलंबिया, ब्राझील, पाकिस्तान, केनिया, इटली, बांगलादेश, इंडोनेशिया, श्रीलंका, इराण, थायलंड, अफगाणिस्तान, नेपाळ, झिम्बाब्वे आणि नायजेरिया. या देशांतील आहेत. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील कैद्यावर मुख्यतः राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणण्याचा किंवा देशविरोधी कृत्ये केल्याचा आरोप आहे

तर दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, इंडोनेशिया, नायजेरिया इत्यादी देशांतील लोकांवर फसवणूक, बनावटगिरी, घुसखोरी यांसारख्या आर्थिक गुन्ह्यांमध्ये आणि अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याचा आरोप आहे.

ई-कारागृह प्रणाली

यावर्षी जुलैमध्ये, राज्य कारागृह विभागाने परदेशी नागरिकांसाठी व्हिडिओ कॉल सुविधा सुरू केली होती. या सुविधेत दोषी आणि अंडरट्रायल कैदी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि वकिलांना ई-कारागृह प्रणालीद्वारे दोन आठवड्यात 15 मिनिटांसाठी व्हिडिओ कॉल करू शकतात.

कमीत कमी परदेशी कैद्यांची संख्या असलेल्या कारागृहांमध्ये वर्धा जिल्हा कारागृह, अमरावती मध्यवर्ती कारागृह, नांदेड जिल्हा कारागृह, नाशिक रोड मध्यवर्ती कारागृह, रत्नागिरी विशेष कारागृह, सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.