Thane News : कोणतीही प्रवासी दरवाढ नसलेला ठाणे परिवहनचा ६९४ कोटी रकमेचा अर्थसंकल्प सादर

कोणतीही प्रवासी तिकिटात दरवाढ नसलेला ठाणे परिवहनचा २०२४-२५ चा ६९४ कोटी ५६ लाख रकमेचा मुळ अर्थसंकल्प गुरुवारी सादर करण्यात आला.
TMT Bus
TMT BusSakal
Updated on

ठाणे - पर्यावरणाच्या दुष्टीकोनातून शून्य उत्सर्जन असलेल्या प्रदूषण विरहीत इलेक्ट्रिक व सीएनजी बसेस नव्याने परिवहन उपक्रमात दाखल करून ठाणेकरांना चांगल्या व अधिक मार्गावर सुविधा देण्याबरोबरच तिकीट भाडे कमी करण्यावर भर देत, कोणतीही प्रवासी तिकिटात दरवाढ नसलेला ठाणे परिवहनचा २०२४-२५ चा ६९४ कोटी ५६ लाख रकमेचा मुळ अर्थसंकल्प गुरुवारी सादर करण्यात आला.

तसेच ठाणेकरांना चांगल्या सुविधा व अधिक मार्गावर सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या दंडाच्या रक्कमेत वाढ करून ती शंभर वरून दोनशे रुपये इतकी करण्यात आली आहे. यामध्ये डबल डेकर बसगाड्या खरेदीचे प्रस्तावित करण्यात आले आहे. डिजीटल तिकीट सुविधा आणि पर्यावरणपुरक विद्युत बस खरेदीवर भर देण्यात आला आहे.

ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाने मागील वर्षी २०२३-२४ चा ४८७.६८ कोटी रकमेचा मुळ अर्थसंकल्प सादर केला होता. त्यात यंदाच्या वर्षी या अर्थसंकल्पात वाढ करीत ६९४ कोटी ५६ लाखांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. यामध्ये परिवहन प्रशासनाने महापालिकेकडून तब्बल ४५२ कोटी ४८ लाख इतक्या अनुदानाची मागणी केली आहे.

यंदाच्या अर्थसंकल्पात कोणत्याही प्रकारची भाडेवाढ करण्यात आलेली नाही. तर पर्यावरणाच्या दृष्टीकोणातून शुन्य उत्सर्जन - प्रदुषण असलेल्या १२३ इलेक्ट्रीक बस व २० सीएनजी मिडी बस नव्याने परिवहनच्या उपक्रमात दाखल होणार आहेत. सद्यस्थितीत परिवहनच्या ताफ्यात ठाणे महापालिका परिवहनच्या ताफ्यात ४३४ बसगाड्या आहेत. यामध्ये पर्यावरणपुरक विद्युत बसगाड्यांची संख्या ११४ इतकी आहे.

परिवहन उपक्रमाला केंद्र शासनाच्या स्वच्छ हवा उपक्रमांतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून परिवहन उपक्रमाने १२३ विद्युत बसगाड्यांची खरेदी केली असून त्यापैकी ११४ बसगाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. तर, उर्वरित ९ बसगाड्या येत्या काही महिन्यात दाखल होणार आहेत.

तसेच १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून यंदाच्या वर्षी ४२ आणि पुढील वर्षी ४४ तर, केंद्राच्या पीएम ई बस सेवा योजनेतून १०० अशा एकूण १८६ विद्युत बसगाड्या परिवहनच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. यामुळे विद्युत बसगाड्यांची संख्या ३०९ इतकी होणार आहे. ठाणेकर प्रवाशांना डिजीटल तिकीट सुविधा सुरू करून देण्यात येणार आहे.

१२३ बसगाड्यांसाठी कोपरी येथील कन्हैय्यानगर आगार विकसित करण्यात आला आहे. पीएम ई बस सेवा योजनेंतर्गत येणाऱ्या १०० बसगाड्यांसाठी कोलशेत आगार आणि केंद्र शासनाच्या १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत येणाऱ्या ४२ बसगाड्यांसाठी कळवा आगार विकसित करण्याचे नियोजन आहे.

अशातच प्रवासी भाड्यापोटी सध्या अस्तित्वात असलेल्या बस आणि नव्याने दाखल होणाºया बस असे मिळून १५८ कोटी ४० लाखांचे उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे. तसेच जाहीरात, पोलीस ग्रॅन्ट व महापालिकेकडून दिलेल्या सवलती पोटी दिलेले अनुदान हे अपेक्षित उत्पन्नात धरण्यात आले आहे.

तर जेष्ठ नागरीक ५० टक्के, दिव्यांग १०० टक्के, विद्यार्थी ५० टक्के, ७५ वर्षावरील जेष्ठ नागरीक, स्वांतत्र्य सेनिकांची विधवा पत्नी व सोबत सह प्रवासी, तसेच इतरांना देण्यात येणाºया सवलतीमुळे परिवहनवर ताण पडणार आहे. त्याची भरपाई म्हणून अनुदानातून मिळावी यासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा करावा लागणार आहे.

अशातच १ लाख लोकसंख्येमागे ३० बस अपेक्षित आहेत. त्यानुसार ठाणे शहराची सध्याची २३ लाख लोकसंख्या लक्षात घेतल्यास ठाणेकरांना ७९३ बसची आवश्यकता असल्याचे अर्थसंकल्पात नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या अस्तित्व्त असलेल्या बसची संख्या हि कमी असल्याचे निदर्शनास येत आहे.

१२३ कोटी ८८ लाखांची कर्मचारी थकीत रक्कम

ठाणे परिवहन सेवेकडील कर्मचाऱ्यांना १ डिसेंबर २०२२ पासून सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. त्यापोटी व इतर थकीत द्यावी लागणारी फरकाच्या रकमेसह १२३ कोटी ८८ लाख इतकी रक्कम थकीत आहे. यामध्ये सहाव्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता फरक २० कोटी ४ लाख २१ हजार, सार्वजनिक सुट्ट्या १४ कोटी ४५ लाख ८५ हजार, वैद्यकीय भत्ता ६ कोटी ७ लाख ५५ हजार, रजा भत्ता १० कोटी ५८ लाख ७९ हजार, शैक्षणिक भत्ता २६ लाख ७७ हजार, पूरक व प्रोत्साहन ६० लाख ८६ हजार तर, ७ व्या अवेत्न आयोगानुसार १ जानेवारी २०१६ पासून सन २०२३-२४ व २०२४-२५ या दोन हप्त्याची रक्कम ५२ कोटी ४ लाख ३ हजार यांचा समावेश आहे.

उत्पन्न वाढीसाठी उपाययोजना

ठाणे शहरामध्ये अवैधरित्या वाहतुक करणा-या वाहनांवर आळा घालण्याकरिता सातत्याने प्रयत्न करण्यात येणार असून, त्याजोगे ठाणे परिवहन सेवेच्या प्रवासी संख्येत वाढ करण्याचे नियोजन आहे. तसेच ठाणे परिवहन सेवेच्या बस ताफ्यामध्ये मोठ्या संख्येने 'मिडी' बसेस घेऊन ज्या शहरी व ग्रामीण परिसरातील छोट्या रस्त्यांवर बस सेवा जिथे उपलब्ध नाही.

असे मार्ग सेवा पाहणी करुन त्या मार्गावर बस फे-यांचे नियोजन करुन जास्तीत-जास्त प्रवासी परिवहन सेवेकडे आकर्षित करण्याचे नियोजन आहे. ठाणेकरांनी खाजगी वाहनांचा वापर करणे ऐवजी, परिवहन उपक्रमाच्या बसेसचा वापर करण्याबाबत डिजिटल माध्यमांतून जनतेला आवाहन करणे, जेणेकरुन वाहतुक कोंडी कमी होऊन शहराचे प्रदूषण ही कमी होण्यास मदत होईल.

परिवहन उपक्रमातील सेवाजेष्ठ कर्मचा-यांना स.वा. निरिक्षक या पदाचा पदभार देऊन मार्ग तपासणी कार्यक्रमावर जास्तीत-जास्त भर देण्यात येत असून विना तिकीट प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या कमी करण्यावर भर देण्यात येत आहे. विना तिकीट प्रवासी सापडल्यास त्यावर करावयाची दंड आकारणी १००रुपये ऐवजी २०० रुपये करण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे.

महापालिकेकडून हवयं ४५२ कोटींचे अनुदान

ठाणे परिवहनने महापालिकेकडून २०२४-२५ साठी परिवहनने पालिकेकडून ४५२ कोटींच्या अनुदानाची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यापैकी महसुली व भांडवलीसह ३४८ कोटी ८२ लाख व संचलन तुट अनुदानापोटी १०३ कोटी ६६ लाख इतक्या अनुदानाची ठामपाकडे मागणी करण्यात आली आहे.

वाहतुकीतून १५८ कोटी ४० लाखांचे अपेक्षित उत्पन्न

ठाणे परिवहन सेवेतील ४५ बसेसच्या माध्यामतून १४ कोटी १९ लाख, जेएनयुआरएमअंतर्गत १९० बसेसच्या माध्यामतून ६२ कोटी ७१ लाख, वातानुकुलीत वोल्वो १५ बसेसमधून ५ कोटी ५३ लाख, महिलांकरिता ५० तेजस्विनी बसेसमधून १२ कोटी ३६ लाख इतके उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.

तसेच नव्याने परिवहन उपक्रमात दाखल होणाऱ्या १२३ इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यामतून ३६ कोटी ६९ लाख व नवीन मिडी २० सीएनजी बसेसपासून ४ कोटी ६३ लाख तसेच ४२ इलेक्ट्रिक बसेसच्या माध्यमातून ५ कोटी ९१ लाख, पीएम ई बस सेवेअंतर्गत इलेक्ट्रिक १०० बसेसच्या पासून १६ कोटी ३८ लाख असे १५८ कोटी ४० लाखांचे इतके प्रवासी तिकीट विक्रीतून वर्षिक उत्पन्न अपेक्षित धरण्यात आले आहे.

३०६ बसेस ठाणेकरांच्या सेवेत होणर दाखल

केंद्र व राज्य शासनाच्या धोरणानुसार शुद्ध हवा शून्य प्रदूषण तत्वाचा अवलंब करण्याच्या दृष्टीने १२३ इलेक्ट्रिक बसेस पैकी ११४ (+९) बसेस प्राप्त झाल्या आहेत. आगामी दोन वर्षाच्या कालावधीत १८६ (१००+४२+४४) इलेक्ट्रिक बसेस प्राप्त होणार आहे. त्यामुळे भविष्यात ठाणेकरांच्या सेवेत ३०६ बसेस दाखल होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.