आजच 7/11 बॉम्बस्फोटाला सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत.
7/11 बौम्बस्फोटातील खटल्यात फाशीची शिक्षा सुनावलेल्या पाच आरोपींच्या सुनावणीसाठी आता स्वतंत्र खंडपीठ नियुक्त करण्याच्या सूचना मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. त्यामुळे सोळा वर्षे उलटूनही अद्याप बौम्बस्फोटातील पीडितांना न्यायाची प्रतिक्षा कायम राहिली आहे.
यासंदर्भात आज या सुनावणीत हजारो कागदपत्रे आणि पुरावे दाखल असून सुनावणी पूर्ण होण्यासाठी किमान पाच ते सहा महिने लागतील असे विशेष सरकारी वकील राजा ठाकरे यांनी सांगितले आहे. त्यामुळे न्या. आर. डी. धनुका आणि एम. जी. न्या. सेवलीकर यांच्या खंडपीठाने यासाठी स्वतंत्र खंडपीठ नियुक्त करण्याचे निर्देश दिले. आजच 7/11 बॉम्बस्फोटाला सोळा वर्षे पूर्ण झाली आहेत.
या बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा कनिष्ठ न्यायालयाने निकाल देऊनही सात वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र याप्रकरणी पाच दोषसिद्ध आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब झालेले नाही. हे प्रकरण सोमवारी सुनावणीसाठी आले, तेव्हाही कामाचा ताण अधिक असल्याने ही सुनावणी पूर्ण करण्यासाठी पाच ते सहा महिने लागणार असल्याने न्यायालयाने त्याच्या सुनावणीची तारीख निश्चित करण्यासाठी प्रकरण ऑगस्टमध्ये ठेवले आहे.
दरम्यान, ११ जुलै २००६ रोजी मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकल गाड्यांमध्ये एकामागोमाग एक असे साखळी बॉम्बस्फोट घडवून मुंबईला हादरवून सोडणाऱ्या घटनेला आज १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. लोकल बॉम्बस्फोट मालिकेनंतर अवघ्या सहा महिन्यांतच ११०० पानांचे आरोपपत्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) मोक्का कोर्टात दाखल केले होते. यासंबंधी १३ जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. मात्र, खटल्याचे कामकाज रखडले होते. मोक्का या कायद्याअंतर्गत खटला चालवण्यास आरोपींनी आक्षेप घेतल्याने खटला सुरू होणे लांबत गेले होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.