Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसी कंपनीत भीषण स्फोटात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू, 64 जखमी, संख्या वाढण्याची भीती

Dombivli MIDC Blast : डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मधील अमुदान या केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 64 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते आहे.
Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC BlastEsakal
Updated on

डोंबिवली - डोंबिवली एमआयडीसीतील फेज 2 मधील अमुदान या केमिकल कंपनीत झालेल्या स्फोटात 8 जणांचा मृत्यू झाला असून 64 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ही संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त केली जाते आहे.

डोंबिवली एमआयडीसी केमिकल कंपनीत आज (गुरुवारी) दुपारी 2 च्या सुमारास रिऍक्टरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली. आजूबाजूच्या कंपन्या देखील या आगीच्या विळख्यात सापडल्या. यामुळे घटनास्थळी पाच ते सहा छोटे मोठे स्फोट झाले. या घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 64 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी आगीचे लोळ आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर येत होते. नागरिकांनाही या घटनेचा मोठ्या प्रमाणावर त्रास झाला.

Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blast: डोंबिवली हादरली! MIDC मध्ये मोठा स्फोट, तीन जणांचा होरपळून मृत्यू; ३० ते ४० जण जखमी

या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. आगीची माहिती मिळताच कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, ठाणे आदी ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार राजू पाटील यांनी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली आणि पुढील निर्देश दिले.

Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blast: डोंबिवली MIDCला आहे भीषण स्फोटांचा मोठा इतिहास, याआधी कधी-कधी झालेले भीषण ब्लास्ट? वाचा Timeline

काय घडली घटना?

डोंबिवली एमआयडीसी फेज दोन मध्ये अमुदान केमिकल कंपनीत दुपारी 2 च्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे तीन ते चार किलोमीटर परिसरात जाणवले. यामुळे आजूबाजूचे कारखान्यांचे नुकसान झाले, तर इमारतींच्या काचा ही फुटल्या तसंच दुकाने, वाहनांचे नुकसान झालं आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर असल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सायंकाळी घटनास्थळी भेट देत घटनेची पूर्णपणे माहिती जाणून घेतली. तसेच बाजूला असलेल्या म्हात्रेपाडा येथील नागरिकांची देखील भेट घेऊ त्यांची परिस्थिती जाणून घेतली. यानंतर त्यांनी एम्स रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली आहे.

Dombivli MIDC Blast
Dombivli MIDC Blast: डोंबिवली हादरली! MIDC मध्ये मोठा स्फोट, तीन जणांचा होरपळून मृत्यू; ३० ते ४० जण जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.