Lemon News: ऐन सणासुदीत लिंबू महागला, एका लिंबासाठी मोजावे लागणार इतके रुपये

Latest marathi News:
Lemon News: ऐन सणासुदीत लिंबू महागला, एका लिंबासाठी मोजावे लागणार इतके रुपये
Updated on

Latest Vashi news : कोरोना काळात आणि उन्हाळ्यात सर्वाधिक पसंती असणारा लिंबू आता पुन्हा भाव खात आहे. बाजारात वर्षभर उपलब्ध होणाऱ्या फळपिकांमध्ये लिंबाचा अव्वल क्रमांक लागतो. क जीवनसत्त्वामुळे लिंबूवर्गीय फळांची मागणी कायम आहे.

जून ते सप्टेंबरपर्यंतचा पावसाळी लिंबांचा हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. त्यामुळे मालाची आवक घटल्याने लिंबाचे भाव पुन्हा कडाडू लागले आहेत. घाऊक बाजारात मोठे लिंबू चार रुपयांना; तर किरकोळ बाजारात तब्बल आठ रुपयांना विकले जात आहे.

Lemon News: ऐन सणासुदीत लिंबू महागला, एका लिंबासाठी मोजावे लागणार इतके रुपये
Maratha Andolan Vashi च्या Chhatrapati Shivaji Chowk मध्ये पोहोचलं, अंगावार काटा आणणारा Dron Video

नवी मुंबईमधील वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कर्नाटक राज्यासह पश्‍चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात लिंबू विक्रीसाठी दाखल होत असतो. उन्हाळी हंगामात या बाजारात प्रतिदिन साधारणत: १० ते १५ ट्रक अथवा टेम्पोची आवक होत असते.

Lemon News: ऐन सणासुदीत लिंबू महागला, एका लिंबासाठी मोजावे लागणार इतके रुपये
Navi Mumbai Crime : वाशीमध्ये रिक्षाच्या धडकेत पोलीस कॉन्स्टेबल जखमी

पावसाळ्यात पोषक वातावरणामुळे लिंबाच्या उत्पादनात वाढ झाल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात आवक होते. सध्या पावसाळी हंगाम संपत आल्यामुळे विविध ठिकाणाहून लिंबाची अवघी पाच ते सात वाहने बाजार समितीत दाखल होत आहेत.

या अनुषंगाने सध्या घाऊक बाजारात चार रुपयांना विक्री होत आहे, तसेच किरकोळ बाजारात लहान लिंबाला पाच रुपये; तर मोठ्या लिंबाला आठ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना ऐन सणासुदीच्या काळात लिंबूमुळे खिसा खाली करावा लागत आहे. चांगल्या प्रतिचे लिंबू घाऊक बाजारात शेकडा ३०० ते ४०० रुपये भावाने खरेदी होत आहे.

Lemon News: ऐन सणासुदीत लिंबू महागला, एका लिंबासाठी मोजावे लागणार इतके रुपये
Navi Mumbai Crime: वाशी टोलनाक्यावर राडा; चौघांची एकाला मारहाण, नेमकं काय घडलं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.