८० टक्के मुंबईकर कोरोनाच्या संपर्कात येऊन गेले, TIFR रिसर्च

TIFR कडून एक चांगली सकारात्मक बातमी समोर आली आहे.
Mumbai tops the list of the 403 most crowded cities in the world
Mumbai tops the list of the 403 most crowded cities in the world
Updated on

मुंबई: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा (corona third wave) सामना करण्यासाठी आतापासूनच मुंबईत मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली जात आहे. मोठी कोविड सेंटर्स (covid centers) बनवण्यात येत आहेत. दुसऱ्या लाटेप्रमाणे (second wave) तिसऱ्या लाटेचा फटका बसू नये, यासाठी आत्तापासूनच काळजी घेतली जात आहे. या तिसऱ्या लाटेबद्दल वेगवेगळे अंदाज वर्तवले जात असतानाच, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्चकडून एक चांगली सकारात्मक बातमी समोर आली आहे. TIFR ने वर्तवलेल्या अंदाजानुसार, तिसरी लाट ही दुसऱ्या लाटे इतकी मोठी नसेल तसेच मुंबईतील ८० टक्के लोकसंख्या कोरोनाच्या संपर्कात येऊन गेल्याची शक्यता TIFR ने वर्तवली आहे. TIFR ने असे प्रोजेक्शन मांडले असले, तरी त्यांनी काळजी, सावधगिरी बाळगण्याचाही सल्ला दिला आहे. (80% of Mumbai exposed third wave may not be too large Tata Institute of Fundamental Research)

भारतात कोरोनाची साथ सुरु होऊन १७ महिने झाले आहेत. भारतात २०२० मध्ये नागरिकांनी सर्वप्रथम कोरोनाची लागण झाली. कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांच्या शरीरात अँटिबॉडीचे प्रमाण घटल्यास त्यांना पुन्हा लागण होण्याचा धोका संभवतो. कोरोना होऊन गेलेल्यांना पुन्हा लागण होते का? त्यावरुन महापालिकेला लवकर आजाराचा कल ओळखता येईल. मुंबईत ज्या २० टक्के नागरिकांना अजून कोरोना झालेला नाही, त्यांचे लसीकरण लवकर झाले, तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला नियंत्रणात ठेवता येईल, असे TIFR च्या टेक्नोलॉजी आणि कॉम्प्युटर सायन्स स्कूलचे डीन डॉ. संदीप जुनेजा म्हणाले.

Mumbai tops the list of the 403 most crowded cities in the world
'तुम्हीच सांगा आम्ही कसं काम करायचं?' मुंबईतील व्यापाऱ्यांचा संताप

लसीच्या दोन डोसनंतर मुंबईत इतक्या लोकांना झाली कोरोनाची बाधा

कोरोना प्रतिबंधक लसीचे (vaccine) दोन डोस घेणं आवश्यक आहे. काहीजण पहिला डोस घेतल्यानंतर दुसऱ्या डोसकडे दुर्लक्ष करतात. कोरोनाचे दोन डोस घेण्याचे फायदे आहेत. त्यामुळे कोरोनाची (corona infection) लागण होण्याची शक्यता अत्यंत कमी होते. मुंबई महापालिकेने (BMC) केलेल्या सर्वेक्षणातून (survey) ही बाब समोर आली आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्यांचा कोरोनापासून बचाव होत असल्याचे समोर आले आहे.

Mumbai tops the list of the 403 most crowded cities in the world
मोबाइल नेटवर्कसाठी मुलं झाडावर चढली, अंगावर कोसळली वीज

कोरोना प्रतिबंधक लसीच्या पहिल्या डोसचा परिणाम होतो. पण दुसऱ्या डोसचा त्याहीपेक्षा जास्त फायदा होतो. मुंबई महापालिकेने एक जानेवारी ते १७ जून दरम्यान मुंबईतील २.९ लाख कोविड रुग्णांचे सर्वेक्षण केले. दुसरा डोस घेतल्यानंतर फक्त २६ जणांना कोरोनाची पुन्हा बाधा झाली, तर पहिला डोस घेतलेल्या १०,५०० जण कोविडची बाधा झाली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()