मुंबई ः कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयातून 80 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्ण पळून गेल्याची घटना घडली आहे. या रुग्णाचा मृतदेह बोरिवली स्थानकाबाहेर सापडला असल्यामुळे पुन्हा एकदा पालिकेच्या रुग्णालयात दिल्या जाणाऱ्या सेवा आणि उपचारांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला आहे.
मुंबई पालिकेच्या रुग्णालयांचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय आजोबांचा बोरिवली स्टेशनला मृतदेह सापडला.
आजोबांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
पालिका रुग्णालयांची सुरक्षा व्यवस्था वा-यावर असुन काल पहाटेपासून 80 वर्षीय आजोबा बेपत्ता होते. कोरोना पाॅझिटिव्ह असल्याने शताब्दी रुग्णालयात ते उपचार घेत होते. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आजोबांचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईंकांनी केला आहे.
महापौर देणार रुग्णालयाला भेट -
शताब्दी रुग्णालयातून 80 वर्षीय कोरोनाग्रस्त वृध्द पळून गेल्याच्या घटनेनंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि पालिकेचे आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले हे रुग्णालयाला भेट देणार आहेत. तिथली परिस्थिती पाहून काय कारवाई करायची यावर निर्णय घेण्यात येईल असे अमेय घोले यांनी स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.