अबब! गरिबांच्या जेवणावरही डोळा, 80 हजार जेवणाची पाकीटं खाल्ली तरी कोणी?

meal
meal
Updated on

कल्याण : लॉकडाऊनच्या काळात कल्याण डोंबिवली महानगरपालिका गोरगरिबांना पुरवत असलेले जेवण हे निकृष्ट दर्जाचे असल्याचे वृत्त सकाळने प्राप्त झालेल्या तक्रारीवरून प्रसिद्ध केले होते. यावर केडीएमसी प्रशासनाने रोज 80 हजार जेवणाचे पॅकेट आमच्याकडून वाटले जात असल्याचा दावा केला होता.

अनेक ठिकाणी मागणीपेक्षा कमी पाकीट येत असून काही ठिकाणी पॅकेटच वाटले जात नसल्याचा आरोप लोकप्रतिनिधींनी केला आहे. तर बातमीची दखल घेत काही सामान्य नागरिकांनीही जेवणाचा दर्जा हा निकृष्ट असून अनेक ठिकाणी जेवणच पोहोचत नसल्याचे परखड मत सकाळकडे व्यक्त केले आहे. त्यामुळे प्रशासन रोज वाटत असलेली 80 हजार फूड पाकीट नेमके खातंय तरी कोण? असा उपरोधिक सवाल आता सर्व स्तरातून विचारला जात आहे.

पिसवली परिसरात दोन काऊंटरवर प्रत्येकी 300 लोकांचे जेवण वाटले जाते. मात्र या ठिकाणी 500 पेक्षा अधिक पाकिटांची गरज आहे. त्यात अन्नाचे प्रमाणही कमी असते. त्यामुळे 80 हजार पाकीट कुठे वाटली जातात हा एक संशोधनाचा विषय असल्याचे मत नगरसेवक मोरेश्वर भोईर यांनी व्यक्त केले.

तसेच केडीएमसीने दिलेली खिचडी निकृष्ट दर्जाची असून अनेक ठिकाणी जेवणही पोहचत नाही, याबाबत अनेकदा प्रशासनाकडे तक्रार केली आहे. मात्र याचा काही उपयोग झाला नाही, अशी व्यथा ही  कल्याण येथील सामान्य नागरिक मांडत आहेत. दरम्यान या सर्वाबाबत पालिका प्रशासनाला संपर्क साधला असता अन्नाची मागणी दिवसेंदिवस वाढत असून प्रभाग क्षेत्रानुसार आमचे प्रभाग अधिकारी गरजेनुसार अन्न पुरवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार 
केडीएमसीकडून वाटण्यात येत असलेल्या जेवणाचा दर्जा हा अत्यंत हीन असून या अन्न घोटाळ्याची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार प्रमोद( राजू) पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

सांगाव सोनारपाडा प्रभागात पालिकेकडून  अद्याप एकही जेवणाचे पाकीट वाटले गेले नाही. या ठिकाणीही बरेच गरुजू लोक आहेत. याविषयी संबंधित पालिका अधिकाऱ्यांकडे विचारणाही करण्यात आली होती. 
- सुनीता पाटील, नगरसेविका 

10 प्रभाग क्षेत्रामध्ये 100 पेक्षा जास्त वितरण केंद्र आहेत. संबंधित प्रभाग क्षेत्र अधिकारी मागणीनुसार जेवण पुरवतात. पदार्थाची चव अधिकारी स्वतः तपासतात ( टेस्ट ) व रोजच्या सर्व नोंदी रजिस्टर मध्ये ठेवल्या जातात. भोजन व्यवस्थापनेसाठी एकूण चार  कंत्राटदार नेमण्यात आले आहे. 
- सत्यवान उबाळे, नोडल ऑफिसर , भोजन व्यवस्था
 

80,000 meal packets do not arrive by kdmc

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.