लॉकडाऊन वाढवायला, ८४ टक्के नागरिक अनुकूल

लोकल सर्वेच्या ऑनलाईन सर्वेक्षणातील माहिती
Lockdown
Lockdownesakal
Updated on

मुंबई: कोरोना लाटेला थोपवण्याासाठी राज्यात सुरु असलेले लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यास (extend lockdown) बहुतांश लोक अनुकूल (people in favour)आहेत. लोकल सर्वे या ऑनलाईन वेबसाईटने केलेल्या ताज्या सर्वेक्षणातून ही माहिती पुढे आली. या सर्वेक्षणात 84 टक्के नागरिकांनी 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवायला पसंती दिली आहे. 14 टक्के लोकांनी लॉकडाऊनला विरोध दर्शवला आहे. या ऑनलाईन सर्वेक्षणात राज्याच्या 30 जिल्ह्यातील 18 हजार लोकांनी सहभाग नोंदवला, त्यात 66 टक्के पुरुष तर 34 टक्के महिलांचा सहभाग असल्याचा दावा कंपनीने केला आहे. (84 percent people in favour to extend lockdown period)

लोकल सर्वे या ऑनलाईन कंपनीने लॉ़कडाऊन संदर्भात वेगवेगळे प्रश्न केले होते. यामध्ये 43 टक्के लोकांनी 31 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याला पसंती दिली, तर 43 टक्के लोकांनी लॉकडाऊन सुरु ठेवा मात्र या काळात सर्व स्टोर्स,दुकानांना होम डिलीव्हरीसाठी परवानगी देण्याची मागणी केली. तर 14 टक्के लोकांना लॉकडाऊनचा काळ वाढवण्याला विरोध दर्शवला आहे.

Lockdown
'मुलीला एकटं सोडू शकत नाही', विलेपार्ल्यात पित्यानेच केली मुलीची हत्या

होम डिलीव्हरी मॉडेल

या दरम्यान 71 टक्के लोकांनी लॉकडाऊमध्ये होम डिलीव्हरीचे मॉडेलला महत्वाचे असल्याचे सांगितले. तर 42 टक्के लोकांनी किराणा आणि औषधांची होम डिलीव्हरीला प्राधान्य द्यायला हवे अस म्हटले आहे. तर 31 टक्के लोकांनी सर्व प्रकारच्या वस्तुची होम डिलीव्हरी सुरु करण्याची मागणी नोंदवली. 28 टक्के लोकांना प्रत्यक्ष खरेदी करायची आहे, त्यामुळे दुकाने खुली कऱण्याची मागणी केली.

Lockdown
Big Breaking: सचिन वाझेवर मोठी कारवाई; पोलिस आयुक्तांचे आदेश

लॉकडाऊनमध्ये या खरेदीला प्राधान्य

- 60 टक्के नागरिकांना मुलांसाठी स्टेशनरी, पुस्तके आणि ऑनलाईन क्लासेसचे साहित्य खरेदी करायचे आहेत.

- 43 टक्के नागरिकांचे शालेय पोषाख,शू आणि रेनकोट खरेदीला प्राधान्य

- 35 टक्के नागरिकांना मुलांसाठी खेळणी घ्यायची आहे.

- 60 टक्के नागरिकांना लॅपटॉप, मोबाईल आणि ऑनलाईसाठीचे साहित्य खरेदी करायची आहे.

- 26 टक्के नागरिकांनी फॅन,एयर कंडीशन,कूलर खरेदीला दिले प्राधान्य

- 19 टक्के नागरिकांची घरघुती वस्तु, बिछाना, फर्निशींग साहित्य खरेदीला पसंती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()