Dr. Lahane Resigns: डॉ. लहाने, पारेख यांच्यासह 9 डॉक्टरांचे राजीनामे; नेमकं काय घडलंय वाचा?

निवासी डॉक्टरांच्या मार्ड संस्थेच्या दबावामुळं त्यांना राजीनामा द्यावा लागला आहे.
Tatyarao Lahane
Tatyarao Lahane
Updated on

मुंबई : जेजे रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाचे प्रमुख डॉ. रागिनी पारेख आणि वरिष्ठ डॉ. तात्याराव लहाने यांच्यासह 9 जणांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेच्या दबावामुळं त्यांनी राजीनामे दिल्याचं सांगितलं जात आहे. (9 doctors including Dr. Tatyarao Lahne and Parekh resigned of post from JJ Hospital)

Tatyarao Lahane
Pune News : स्वतः UPSC फेल होता पण IAS अधिकारी बनून... पुण्यातील तोतयाने अस काही केलं की...

एबीपीच्या माहितीनुसार, मार्डच्या निवासी डॉक्टरांनी या वरिष्ठ डॉक्टरांविरोधात नियमभंगाची तक्रार केली होती. या तक्रारीविरोधात चौकशी करत नेत्ररोग चिकत्साविभागानं यावर स्पष्टीकरण दिलं होत. पण यानंही समाधान झालं नसल्यानं मार्डनं संपाचं हत्यार उगारलं. त्यामुळं उद्वीग्न होऊन लहाने, पारेख यांच्यासह ९ डॉक्टरांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.

Tatyarao Lahane
Ahilyanagar : अहमदनगरचं नामांतर 'अहिल्यानगर' होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

वरिष्ठ डॉक्टरांचे राजीनामे आणि मार्डच्या डॉक्टरांचा संप यामुळं आता जे जे रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभाग बंड पडण्याच्या मार्गावर आहे. केवळ सहा महिन्यांपूर्वीच रुग्णालयात जॉईन झालेल्या निवासी डॉक्टरांच्या या दबावामुळं डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. मार्डकडून लहाने यांच्यावर दबाव वाढत होता. यासंबंधी तक्रारींची चौकशी देखील झाली पण यामध्ये काहीही निष्पण्ण झालं नसल्याचं विभागानं स्पष्ट केलं होतं. विभागप्रमुख रागिनी पारीख यांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केला आहे.

Tatyarao Lahane
Ahmednagar History : अहिल्यानगर बनलेल्या अहमदनगरच्या नावामागचा कानामात्रा वेलांटी नसलेला इतिहास

मोतीबिंदूमुक्त महाराष्ट्र अभियान राबवलं

मोतिबिंदुमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी डॉ. लहाने यांनी अभियान चालवलं होतं. तसेच अनेक दशकं त्यांनी गरीब रुग्णांवर मोफत उपचारही केले आहेत. न परवडणाऱ्या हजारो शस्त्रक्रिया मोफत केल्या. जेजे रुग्णालयातील नेत्रचिकित्सा विभागाला यामुळं मोठं नाव झालं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.