भ्रष्टाचाराविरोधात मोठ्या लढाईची सुरुवात झाली - किरीट सोमय्या

राज्य शासनाला किरीट सोमय्या यांचा इशारा
kirit somayya
kirit somayyasakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात आता भ्रष्टाचाराविरोधात मोठ्या लढाईला सुरुवात झाली आहे, असा इशारा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्य शासनाला दिला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यासाठी कोल्हापुरकडे निघाले होते पण त्यांना अर्ध्या रस्त्यातूनच मुंबईत परतावं लागलं. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचं जंगी स्वागत केलं. मुलुंड येथील आपल्या घरी दाखल झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

kirit somayya
आरोपांच्या पार्श्वभूमीवर 'सह्याद्री' आणि 'वर्षा'वर होणार महत्त्वाच्या बैठका

सोमय्या म्हणाले, "आता एका दीर्घ लढाईला सुरुवात झाली असून ही क्रांती आहे. महाराष्ट्रात घोटाळेमुक्त प्रशासन आपण बनवून दाखवणार आहोत. ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रात काल मी पाहिलं प्रत्येक रेल्वे स्टेशनवर ज्या पद्धतीनं जनता ज्या प्रेमानं आणि विश्वासानं आली होती. त्यामुळे त्यांना महाराष्ट्र घोटाळेमुक्त व्हावं अशी इच्छा आहे आणि त्याची मला जाणीव आहे. लोकांच्या या विश्वासाला आपले सर्व कार्यकर्ते जागणार आहोत. ३१ डिसेंबरपर्यंत उद्धव ठाकरे आणि त्यांचं आलीबाबा चाळीस चोर मंत्रिमंडळ यातील जे भ्रष्टाचारी आहेत त्या सगळ्यांवर कारवाई होणार हे मी आपल्याला खात्रीपूर्व सांगतो"

kirit somayya
टागोरांंच्या लंडनमधील घराची होणार विक्री; ममता बॅनर्जी खरेदीच्या तयारीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचारमुक्त भारत बनवला. पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारने भ्रष्टाचारयुक्त महाराष्ट्र निर्माण केला. मोदींच्या जन्मदिनी अडीच कोटींहून अधिक लोकांचं लसीकरण केलं, हे फक्त मोदीचं करु शकतात. एका बाजूला मोदी सरकार एका दिवसात अडीच कोटी लसीकरण करतं यानंतर बघता बघता १०० कोटी मोफत लसींच्या डोसचं लक्ष आपण आता पूर्ण करणार तर दुसरीकडे उद्धव ठाकरे काय करतात? त्यांनी मुंबई महापालिकेत १ कोटी लसींसाठी ग्लोबल टेंडर काढणार होते. या ग्लोबल टेंडरमध्ये ११ लोकांनी अर्ज भरला. या सर्व अकराच्या अकरा कंपन्या बोगस कंपन्या होत्या. हे किरीट सोमय्यानं सिद्ध करुन दाखवलं. यामुळे घोटाळेबाज मुंबई महापालिका आणि उद्धव ठाकरेंच्या सरकारला हे टेंडर रद्द करावं लागलं, असंही सोमय्या यावेळी म्हणाले.

kirit somayya
चंद्रकांत पाटलांच्या इशाऱ्याला काँग्रेस घाबरत नाही - पटोले

एप्रिल २०२१ मध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेत एका महिन्यात एका आठवड्यात मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या हाफकीन इन्स्टिट्यूटला ७७ हजार रेमडेसेवीरचं टेंडर देण्यात आलं. हे इंजेक्शन ६६५ रुपयांना तयार केलं जातं. पण मुंबई महापालिकेनं ते १६६५ रुपयांना विकलं. ७७ रेमडेसेवीर मुंबई महापालिकेनं घेतली. त्यामुळे यामध्ये ७७ हजार कोटी रुपये मातोश्री बंगल्याच्या कोणत्या कोपऱ्यात लपवून ठेवले आहेत? असा सवाल सोमय्यांनी केला. तसेच उद्धव ठाकरेंनी कोविड काळात लोकांची सेवा करण्याऐवजी त्यांना लुटण्याचं काम केल्याचा गंभीर आरोपही केला.

मुलुंड पूर्व पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरला सोडणार नाही - सोमय्या

काल मुलुंड पूर्व पोलीस स्टेशनच्या इन्स्पेक्टरनं उद्धव ठाकरेंच्या सांगण्यावरुन मला घरात कोंडून ठेवलं होतं. पोलिसांच्या दडपशाहीनं हद्द केली आहे. कोल्हापूरमध्ये मला प्रवेश बंदीचे आदेश निघाले असताना मला मुंबईत का डांबून ठेवलं गेलं असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.