बाप नंबरी, बेटा दसनंबरी! हॉटेलचे लाखोंचे बिल न देताच खिडकीवाटे पलायन

crime
crimesakal
Updated on
Summary

ही घटना खारघर महिला थ्री स्टार हॉटेल मध्ये घडली. या विषयी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खारघर (मुंबई): सुरवातीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करीत असल्याचे सांगितले. त्यानंतर हॉटेलमध्ये खोली भाडयाने घेवून राहणाऱ्या वडील आणि मुलाने सात महिन्याचे पंचवीस लाख रुपये बिल न देता हॉटेलच्या खिडकीतून पलायन केले. ही घटना खारघर महिला थ्री स्टार हॉटेलमध्ये घडली आहे. या विषयी खारघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime
खारघर, तळोजातील प्रदूषणाची अखेर पालकमंत्र्यांकडे तक्रार 

मुंबई मरोळ अंधेरी येथील मुरली मुरुगेश कामत (43) हे फिल्म इंडस्ट्रीमध्ये ऍनिमेशन व बी एफ एक्स म्हणून काम करीत आहे. तसेच मुलगा तनिश (वय-12) यांचे खारघर मधील रियान इंटर नॅशनल स्कुलमध्ये प्रवेश घेत असल्याचे सांगून मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात खारघर मधील थ्री स्टार हॉटेलमध्ये सात महिन्यासाठी दोन डिलेक्स खोल्या भाड्याने घेतले. कोरोनामुळे व्यवहार ठप्प असून एक महिन्यानंतर खोली भाडे देतो, तो पर्यंत पासपोर्ट ठेवून घ्या. असे हॉटेल मॅनेजरला सांगितले. दरम्यान हि परिस्थिती हॉटेलच्या मॅनेजरने हॉटेल मालक संतोष शेट्टी यास सांगितले.

crime
धोकादायक घराचा वापर बंद करा; खारघर-तळोजामधील 150 इमारतींना पालिकेची नोटीस

शेट्टी यांनी होकार दिल्यावर मॅनेजरने कामत याना एक डिलेक्स खोली राहण्यासाठी तर दुसरी खोली भेटायला येणाऱ्या नागरिकांसाठी असे दोन खोल्या भाड्याने दिले. त्यास लागणारे हॉटेल आणि बाहेरील खाद्य पदार्थाचे बिल काही दिवस न चुकता देत असे. डिसेंबर महिन्यात मॅनेजरने खोली आणि जेवणाच्या बिलाची मागणी केली असता, खोपोली येथे इमॅजिक विकत घेण्याचा व्यवहार विषयी बोलणी सुरु असून ते झाल्यावर लगेच बिल देतो असे सांगितले. हॉटेलमध्ये नेहमी राहणे, खाणे सुरु असताना फेब्रुवारी महिन्यात कामत यांनी हॉटेल मॅनेजरला भेटून कोरोनामुळे सिंगापूर येथील बँक असून काही दिवसात पैसे देतो असे सांगितले.

crime
सिडको खारघर टेकडींवर हेवन हिल्स साकारणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते ऑनलाईन उदघाटन

हॉटेल मॅनेजर कडून पैशाची विचारणा होत असल्यामुळे मे महिन्यात एस आणि आयसीआय बँकेचे तीन धनादेश दिले. 15 जून नंतर धनादेश बँकेत जमा करण्यास सांगितले. जून महिन्यात धनादेश जमा करण्यापूर्वी मॅनेजरने कामत यास विचारणा केली असता, काही दिवस धनादेश टाकू नये, असे सांगून खोली भाडे आणि जेवणाचे झालेले बिल मेलवर पाठविण्यास सांगितले. दरम्यान 17 जुलैला सकाळी ते मुरली राहत असलेल्या रुमची बेल वाजविले असता उघडले नाही. पुन्हा तासाभरानंतर बेल वाजविले असता, प्रतिसाद मिळत नसल्यामुळे दुय्यम चावीने दरवाजा उघडला. वडील आणि मुलगा खोलीच्या खिडकी लगत असलेल्या डक वाटे पलायन केल्याचे समजले. सात महिन्याचे दोन डिलेक्स खोलीचे भाडे आणि जेवणाचे असे पंचवीस लाख रुपये बिल न देता पलायन केल्याची तक्रार खारघर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहे.

crime
खरंच! खारघर डोंगरात बिबट्याचा वावर?

हॉटेल मध्ये नेहमी फिल्म इंडस्ट्रीतील व्यक्ती राहत असतात. त्यात मुरली कामात हे येताना भाड्याने बीएमडब्ल्यू गाडीने आले. हातात ब्रेसलेट, गळ्यात चैन, सुटाबुटातील कपड्यामुळे श्रीमंत कुटुंबामध्ये राहत असल्याचे वाटले, आज उद्या पैसे देतो असे सांगितले. त्यात कोरोनामुळे अडचण असावी असे वाटत असल्यामुळे दर महिन्यात काही दिवसापूर्वी एका पोलिस अधिकाऱ्याकडून मुरली कामत हा फ्रॉड व्यक्ती असून मुंबईतील अनेक हॉटेल मध्ये त्यांनी अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याचे समजले. या विषयी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

- संतोष शेट्टी, थ्री स्टार हॉटेल मालक ( बातमीदार -सुमित्रा चव्हाण)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.