Mumbai: खवळलेल्या समुद्रात उडी घेत हिरे व्यापाऱ्यानं संपवलं जीवन; काय घडलं नेमकं? जाणून घ्या

Diamond Businessman Death : पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी पोचले खरे मात्र खवळलेल्या समुद्रात शहा यांना बाहेर काढणे अडचणीचे ठरत होते
Mumbai: खवळेला समुद्रात उडी घेत हिरे व्यापाऱ्यानं संपवलं जीवन; काय घडलं नेमकं? जाणून घ्या
Mumbaisakal
Updated on

Mumbai Rain Update : हिरे व्यापारी संजय शहा यांनी रविवारी सकाळी सातच्या सुमारास हॉटेल ताज जवळील समुद्रात उडी घेत आत्महत्या केली. व्यवसायात तोटा झाल्याने गेले काही दिवस ते निराश होते, अशी माहिती कुलाबा पोलिसांना मिळाली आहे.

आठवड्याच्या आत व्यवसायिकाच्या आत्महत्येचे हे दुसरे प्रकरण आहे. १७ जुलैला व्यवसायिक भावेश सेठ यांनी वांद्रे वरळी सागरी सेतुवरून समुद्रात उडी घेत आत्महत्या केली होती.

Mumbai: खवळेला समुद्रात उडी घेत हिरे व्यापाऱ्यानं संपवलं जीवन; काय घडलं नेमकं? जाणून घ्या
Mumbai Crime: मुंबईत काय चाललंय? महिलेला पाहून तरुणाने काढली पॅन्ट, पोलिसांनी घेतली दखल Video Viral

महालक्ष्मी परिसरात कुटुंबासोबत राहणाऱ्या शहा यांचे वांद्रे कुर्ला संकुलातील भारत डायमंड बोर्स इमारतीत कार्यालय आहे. रविवारी पहाटे त्यांनी ' मॉर्निंग वॉक 'चे निमित्त करत घर सोडले. त्यांनी टॅक्सी घेतली. प्रथम ते सागरी सेतूवर आले. निर्माल्य समुद्रात सोडायचे आहे, असे सांगत त्यांनी टॅक्सी चालकाला सेतूवर थांबण्याची विनंती केली. मात्र सेतूवर थांबल्यास वाहतूक पोलीस दंड आकारतात असे सांगत चालकाने टॅक्सी थांबवण्यास नकार दिला.

त्यामुळे शहा यांनी टॅक्सी गेट वे ऑफ इंडिया कडे घेण्यास सांगितली. तेथे टॅक्सी सोडल्यावर शहा यांनी ताज हॉटेल समोरून समुद्रात उडी घेतली. हे पाहणाऱ्या व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली. पोलीस, अग्निशमन दल घटनास्थळी पोचले खरे मात्र खवळलेल्या समुद्रात शहा यांना बाहेर काढणे अडचणीचे ठरत होते. अखेर दोरखंड बांधून समुद्रात अग्निशमन दलाचे जवान उतरले आणि शहा यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र तेथे त्यांना उपाचारांपूर्वी मृत घोषित केले गेले.

Mumbai: खवळेला समुद्रात उडी घेत हिरे व्यापाऱ्यानं संपवलं जीवन; काय घडलं नेमकं? जाणून घ्या
Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या प्रतिमेची सिनेट सदस्यांना चिंता ;सिनेट सभेत सदस्यांची विद्यापीठाच्या प्रतिमेसाठी एकजूट

या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेत पुढील चौकशी व तपास सुरू केला आहे.

Mumbai: खवळेला समुद्रात उडी घेत हिरे व्यापाऱ्यानं संपवलं जीवन; काय घडलं नेमकं? जाणून घ्या
Mumbai University : मुंबई विद्यापीठाच्या प्रतिमेची सिनेट सदस्यांना चिंता ;सिनेट सभेत सदस्यांची विद्यापीठाच्या प्रतिमेसाठी एकजूट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.