Ulhasnagar Assembly Constituency 2024: मध्यरात्री उल्हासनगर विधानसभा मतदार संघात 17 लाखांची रोकड जप्त, भरारी पथकाची तपासणीची कारवाई

Vidhan Sabha Elections 2024: उल्हासनगर विधानसभा मतदार संघात भरारी पथकाने मध्यरात्री केलेल्या तपासणीत 17 लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली. या रकमेच्या वैध पुराव्याअभावी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे.
Ulhasnagar Assembly Constituency 2024:
Ulhasnagar Assembly Constituency 2024:sakal
Updated on

उल्हासनगर: निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी आदर्श आचारसंहितेच्या पालनासाठी उल्हासनगर विधानसभा मतदार संघात नेमलेल्या भरारी पथकाने मध्यरात्री केलेल्या धडक तपासणीच्या कारवाईत 17 लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली आहे. या रोख रकमेसंदर्भात कोणताही वैध पुरावा नसल्याने ही कारवाई निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी महत्त्वाची ठरली असून या रकमेची आयकर विभागाच्या माध्यमातून तपासणी सुरु आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.