विरारच्या विवा लॉ कॉलेजच्या मुस्लिम प्राध्यापिकेने कॉलेजच्या वातावरणाला कंटाळून राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. प्राध्यापिकेच्या राजीनाम्याचा संबंध कर्नाटकच्या हिजाब प्रकरणाशी लावला जातोय.
कर्तव्य बजावत असताना त्रास होत असल्याचा दावा प्राध्यापिकेने केलाय. अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने आपल्याला प्राध्यापिकेच्या पदाचा राजीनामा द्यावा लागतोय,असे तिने राजीनाम्यात म्हटले. (A Muslim professor of Viva Law College in Virar has resigned due to frustration of college environment)
प्राध्यापिकेच्या राजीनाम्यानंतर कर्नाटक हिजाब प्रकरणाची चर्चा सध्या विरारमध्ये आहे. तर सोशल मीडियावरही या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली.तर या प्रकरणासंबंधीत विवा कलेजच्या व्यवस्थापनाकडून हे सर्व आरोप फेटाळून लावले. कर्नाटक हिजाब प्रकरणाचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचा दावा कॉलेज व्यवस्थापकाने केलाय.
विशेष म्हणजे ही राजीनामा देणारी प्राध्यापिका अद्याप समोर आलेली नाही आणि याविषयी कोणतीही प्रतिक्रिया तिने दिली नाही. सोबतच वसई, विरार, नालासोपारा कोणत्याही पोलीस ठाण्यात प्राध्यापिकेने तक्रार केली नाही.मात्र एका मुस्लिम प्राध्यापिकेने राजीनामा दिल्याने विरारमध्ये हिजाब प्रकरण चिघळण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.