Mumbai News: प्रज्ञासिंग ठाकूर यांच्याविरुद्ध बजावलेल्या त्या वॉरंटला मिळाली स्थगीती

न्या. ए के लाहोटी यांना दिली. याची दखल घेत न्यायालयाने वाॅरंटला स्थगिती दिली | Taking note of this, the court suspended the warrant
sadhvi pradna singh thakur
sadhvi pradna singh thakur sakal
Updated on

Mumbai News: २०- २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्याविरुद्ध बजावलेल्या जामीनपात्र वॉरंटला आज (ता.२०) विशेष एनआयए न्यायालयाने स्थगिती दिली. (nia court pradna singh thakur)

गेल्या सुनावणीला हजर न राहिल्यामुळे सत्र न्यायालयाने १० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट बजावले होते. साध्वी प्रज्ञासिंग यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे, अशी माहिती त्यांच्या वकिलांनी आज न्या. ए के लाहोटी यांना दिली. याची दखल घेत न्यायालयाने वाॅरंटला स्थगिती दिली.

२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावच्या मशिदीजवळ मोटारसायकलवर बॉम्बस्फोट होऊन ६ ठार, तर १०० हून अधिक नागरिक जखमी झाले होते.

या प्रकरणी विशेष एनआयए न्यायालयात सुनावणी सुरू आहे. साध्वी प्रज्ञासिंग यांच्यासह एकूण १३ आरोपींपैकी ५ आरोपींची सुटका झाली असून प्रज्ञासिंग व इतर सहा जणांवर बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) व भारतीय दंड संहितेच्या तरतुदींखाली खटला चालवला जात आहे.(maharshtra news)

विशेष न्यायाधीश ए. के. लाहोटी यांनी प्रज्ञासिंग या सुनावणीला व्यक्तिशः हजर न राहिल्याने त्यांच्या विरोधात वाॅरंट बजावले होते. आज झालेल्या सुनावणीलाही साध्वी प्रज्ञासिंग गैरहजर राहिल्या. त्यांच्यावतीने ऍड.जे.ची मिश्रा यांनी बाजू मांडली व साध्वी यांची तब्बेत बरी नसल्याने त्यांच्यावर  नानावटी रूग्णालयात उपचार सुरू असून त्यांना सुनावणीला गैरहजर राहण्याची सुट द्यावी अशी विनंती त्यांनी केली. (malegaon bomb blast news)

याची दखल घेत न्यायालयाने वॉरंट ला स्थगिती दिली. व २७ मार्चच्या सुनावणीला हजर राहण्यास सांगितले. दरम्यान या खटल्यातील सह आरोपी सुधाकर व्दिवेदी यांनी आज न्यायालयात हजेरी लावली याची दखल घेत न्यायालयाने त्यांच्या विरोधातील वॉरंट रद्द केला.(mumbai news crime)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.