Mumbai Crime: जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी विद्यार्थ्याला अटक

23 जानेवारीला एका विद्यार्थ्याची तक्रार आली होती.पोस्ट करणाऱ्या विद्यार्थ्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.
Mumbai Crime
Mumbai Crimesakal
Updated on

सोशल मीडियावर समाजात जातीय तेढ निर्माण केल्याप्रकरणी मुंबईतील एका विद्यार्थ्याला अटक करण्यात आली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी आरोपी विद्यार्थ्याची ओळख लपवून ठेवण्यात आली आहे.

Mumbai Crime
Navi Mumbai Crime: बंद घरातून चोरट्यांनी चोरला तब्बल इतक्या लाखांचा मुद्देमाल

तसेच आरोपी विद्यार्थी देवनार येथील इंटरनॅशनल इन्स्टिट्युट फॉर पॉप्युलेशन सायन्सचा हा विद्यार्थी असून तो मूळचा लातूरचा रहिवासी आहे.अटक करण्यात आलेला विद्यार्थ्याने कॉलेजच्या संचालकांना एक गोपनीय पत्र पाठवले होते त्या पत्रात त्याने भगवे झेंडे आणि प्रभू रामाच्या आकाराचे पोस्टर्स कॅम्पसमधून उतरवण्यास सांगितले होते.

Mumbai Crime
Navi Mumbai Crime: मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र खेचले

गोवंडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभू श्रीरामा बद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकुराची पोस्ट केल्याप्रकरणी 23 जानेवारीला एका विद्यार्थ्याची तक्रार आली होती.पोस्ट करणाऱ्या विद्यार्थ्याने हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप तक्रारकर्त्याने केला आहे.

त्यानंतर प्राथमिक चौकशी नंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून विद्यार्थ्याला अटक करण्यात आली. त्याला दोन दिवसांहून अधिक काळ पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते आणि नंतर जामिनावर सोडण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Mumbai Crime
Navi Mumbai Crime: पनवेलमध्ये बारावर्षीय मुलीचा झाला बालविवाह, सर्वेक्षणात आले सत्य समोर!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.