Thane Crime: डोंबिवलीत टोळक्याची विद्यार्थ्याला बेदम मारहाण!

A case has been registered at the police station. Three to four people have been arrested by the police | विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन ते चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
Thane Crime: डोंबिवलीत टोळक्याची विद्यार्थ्याला बेदम मारहाण!
Updated on

Crime News: मद्यपान केलेल्या 8 ते 10 जणांच्या टोळक्याने एका महाविद्यालयीन तरुणाला मारहाण केल्याची घटना ठाकुर्ली पुलाजवळ घडली आहे. दोन ते तीन दिवसांपूर्वी ही मारहाणीची घटना घडली असून याप्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन ते चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Thane Crime: डोंबिवलीत टोळक्याची विद्यार्थ्याला बेदम मारहाण!
Thane Politics: आधी घर सांभाळा, मग आव्हान द्या ; नरेश म्हस्के यांचा आदित्य ठाकरेंना टोला

मात्र मुख्य आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत. या टोळक्याकडून पुन्हा या मुलावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मुलाच्या घाबरलेल्या पित्याने याप्रकरणी ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडे लेखी तक्रार करत लक्ष वेधले आहे.

विष्णूनगर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार वेदांत भोईर (वय 20) असे मारहाण झालेल्या जखमी विद्यार्थ्याचे नाव आहे. वेदांत हा काही दिवसांपूर्वी त्याच्या परिचित मित्राच्या बहिणीच्या हळदी समारंभासाठी त्याच्या मित्रांसमवेत दुचाकीवरून गेला होता.

Thane Crime: डोंबिवलीत टोळक्याची विद्यार्थ्याला बेदम मारहाण!
Thane News: पुस्तकी अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांनी विविध कला, छंद जोपासावेत

तेथून रात्री घरी परतत असताना ठाकुर्ली पुलाजवळच्या रस्त्यावरून जाताना दुचाकीवरील एक मुलगा रस्त्यावर थुंकला. थुंकी अंगावर उडाल्याने वेदांत याने त्याला जाब विचारला. त्याचा दुचाकीवरील तरुणाला राग आला. त्या तरूणाने मद्यपान केले होते.

त्याने आपल्या आठ-दहा साथीदारांना ठाकुर्ली पुलाजवळ बोलावून वेदांतला लाथा-बुक्कीसह लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. वेदांतने हल्लेखोरांच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेतली. तरीही पाठलाग करत भागशाळा मैदानाजवळ हल्लेखोरांनी पुन्हा गाठून वेदांतला बेदम मारहाण केली.

यातील काही हल्लेखोरांना वेदांत याने ओळखले आहे. अनेक दिवस उलटूनही याप्रकरणी विष्णूनगर पोलिसांनी फक्त तीन-चार जणांना अटक केली. यातील करण मढवीसह त्याच्या इतर साथीदारांना अटक करावी, यासाठी वारंवार मागणी करूनही पोलिस त्यांना अटक करत नाहीत.

Thane Crime: डोंबिवलीत टोळक्याची विद्यार्थ्याला बेदम मारहाण!
Thane News: विद्यार्थ्यांनी करून दाखवलं; गाव केलं प्लास्टिकमुक्त!

त्यामुळे तक्रारदार वेदांतचे वडील विजय भोईर यांनी जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंंबरे यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. मुलाच्या मारहाण प्रकरणातील आरोपी मोकाट फिरत आहेत.

काही शिर्डीला जाणाऱ्या साईबाबा पालखीच्या पदयात्रेत सहभागी आहेत. पोलिस जर का हल्लेखोरांना अटक करत नसतील तर मुलाला न्याय मिळण्यासाठी पोलीस आयुक्त कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषणाला बसू, असा इशारा विजय बामा भोईर यांनी दिला आहे.

गरीबाचा वाडा परिसरात राहणारे हल्लेखोर भाडेकरू पध्दतीने राहत आहेत. पोलिसांनी राजकीय दबाव झुगारून हल्लेखोरांना अटक करावी, अशी मागणी विजय भोईर यांनी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Thane Crime: डोंबिवलीत टोळक्याची विद्यार्थ्याला बेदम मारहाण!
Thane News: विद्यार्थ्यांनी करून दाखवलं; गाव केलं प्लास्टिकमुक्त!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.