अल्पवयीन मुलीला वेश्याव्यवसायात ढकलणाऱ्या महिलेला अटक

अल्पवयीन मुलीची सुखरुप सुटका
 A minor girl
A minor girlsakal
Updated on

पालघर: आयुष्यात काहीतरी मोठं करुन दाखवायचं असं स्वप्न (Dream) उराशी बाळगणारे अनेकजण मुंबईच्या दिशेनं वाटचाल करतात. मात्र, या मायानगरी मुंबईत सर्वांचेच स्वप्न साकार होतं असं नाही. पाश्चिमात्य संस्कृतीने व्यापलेल्या मुंबईत (Mumbai)दररोज सर्वकाही आलबेल घडतं असं नाही.मुंबई सारख्या स्वप्ननगरीत मनाला चटका लावणाऱ्या घटनाही घडतात.अशीच घटना मुंबईच्या वसई-विरार परिसरात घडली आहे.एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने वेश्याव्यवसायात(Prostitution) काम करायला भाग पाडणाऱ्या एका महिलेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.पोलिसांकडून (Police)३५ वर्षीय महिलेला पालघर येथून अटक करण्यात आलीय.एका स्वयंसेवी संस्थेकडून(NGO)पोलिसांना याप्रकरणाची माहिती देण्यात आल्याचे वृत्त मुंबई मिररमध्ये प्रसिद्ध झाले आहे. (A woman has been arrested by police forcing a minor girl into prostitution)

 A minor girl
दोन दिवसांचे अधिवेशन मान्य नाही- देवेंद्र फडणवीस

एनजीओने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार,आरोपी महिला एका बारमध्ये काम करायची. एका अल्पवयीनला देहव्यापारात ४ लाख रुपयांना विकण्याचा त्या महिलेचा बेत होता.महिला त्या मुलीला वेश्याव्यवसाय करण्यासाठी जबरदस्ती करत होती. दरम्यान,या संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या महिलेला पकडण्यासाठी सापळा रचला.त्यानंतर वसई विरार रस्त्यालगत असलेल्या खानावळीजवळ देहविक्रीचा व्यवहार करत असलेल्या महिलेला पोलिसांनी अटक केली.त्यानंतर त्या मुलीची पोलिसांनी सुखरुप सुटका केली.आरोपी महिलेला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आयपीसीच्या कलमानुसार पोक्सो कायद्यांतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()