स्लॅब पडताना जर सरकारला कळत नसेल, तर... -प्रवीण दरेकर

सरकारी गेस्ट हाऊसचा स्लॅब कोसळल्याची घटना काल घडली. त्यावेळी आदित्य ठाकरे तेथेच होते.
स्लॅब पडताना जर सरकारला कळत नसेल, तर... -प्रवीण दरेकर
Updated on
Summary

सरकारी गेस्ट हाऊसचा स्लॅब कोसळल्याची घटना काल घडली. त्यावेळी आदित्य ठाकरे तेथेच होते.

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे सुपुत्र आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हे सह्याद्री अतिथीगृहात असताना एक अपघात (Accident) घडला. सह्याद्री अतिथीगृहात (Sahyadri Govt Guest House) मुख्य सभागृहाच्या बाहेरील मोठे झुंबर पीओपी स्लॅबसह कोसळले. शुक्रवारी संध्याकाळी पावणे पाच वाजताच्या सुमारास सह्याद्री अतिथीगृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या विभागाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या (Administrative Officers) बैठका घेत होते. त्यावेळी त्यांच्या बैठकीच्या बाहेरचं शोभेचं मोठं झुंबर (Slab with pop design) त्यावरील पीओपी स्लॅबसह कोसळलं. अचानक झालेल्या या दुर्घटनेत कोणीही जखमी (No Casualties) झाले नाही. मात्र, या घटनेवरून भाजपचे विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी एक सूचक वक्तव्य केलं. गेस्ट हाऊसचा स्लॅब कोसळताना जर सरकारला कळत नसेल, तर 'आमचं सरकार पडणार नाही' म्हणणाऱ्यांना हा एक संकेत आहे की काय असं मला वाटतं, असं दरेकर म्हणाले. (Aaditya Thackeray Sahyadri Guest House Slab Accident BJP Pravin Darekar Mahavikas Aghadi Govt CM Uddhav Thackeray)

स्लॅब पडताना जर सरकारला कळत नसेल, तर... -प्रवीण दरेकर
आदित्य ठाकरे थोडक्यात बचावले; सह्याद्री गेस्ट हाऊसवरील घटना

"सह्याद्री अतिथीगृह हे सरकारचं प्रमुख बैठकांचे ठिकाण आहे. अशा ठिकाणचा स्लॅब कोसळत असताना जर सरकारला कळत नसेल तर हा आमचं सरकार पडणार नाही म्हणणाऱ्या सरकारसाठी हा संकेत आहे की काय असं दिसतंय. आदित्य ठाकरे हे त्यावेळी तेथे होते. त्यांना कसलीही दुखापत झाली नाही ही सुदैवाची बाब आहे. जर स्ल्रॅब कोसळताना त्यांना समजत नसेल, तर सरकार कधी कोसळेल हेदेखील त्यांना कळणार नाही", असे दरेकर म्हणाले.

स्लॅब पडताना जर सरकारला कळत नसेल, तर... -प्रवीण दरेकर
मनसुख हिरेनला विष देण्यात आलं होतं का? तपासात सत्य उघड

"देवेंद्र फडणवीस हे राज्याचे सक्षम मुख्यमंत्री होते. सध्या विरोधी पक्षातही ते चांगलं काम करत आहेत. त्यांना आणि भाजपला एक जनाधार आहे. त्यामुळे आम्हाला फ्रस्ट्रेशनमध्ये जाण्याचं काहीच कारण नाही. आमच्या अशी टिपण्णी करणाऱ्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर या सध्या त्रस्त असल्याचं दिसत आहे. फ्रस्ट्रेशन हे चेहऱ्यावर दिसतं. फडणवीस आणि भाजप नेते वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे करत आहेत. आमचे नेते प्रसन्न चेहऱ्याने वावरत आहे. जनतेची विचारपूस करत आहेत. पण मुंबईच्या महापौर आणि काही नेतेमंडळीच्या चेहऱ्यावर मात्र एक प्रकारचा त्रास दिसतोय", असा टोला त्यांनी पेडणेकर यांना लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.