'बर्नोल द्या' असं मी सांगणार नाही, आदित्य ठाकरेंचे राजकीय बाण

'बर्नोल द्या' असं मी सांगणार नाही, आदित्य ठाकरेंचे राजकीय बाण
Updated on

मुंबई : महाराष्ट्रात महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये शीतयुद्ध पाहायला मिळतंय. शिवसेनेने एका ट्रोलरचं मुंडन केल्यानंतर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी सर्वांना ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करा असा सल्ला देखील दिला होता. आज आदित्य ठाकरे यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. आम्ही आमचं वचन पाळलं म्हणून आम्ही सत्तेत आहोत. ज्यांनी वचन पळलं नाही ते आता विरोधात आहेत असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधलाय. 

आमचा फोकस लोकांची कामं करण्यावर

पुढे बोलताना आदित्य ठाकरे म्हणालेत, आता आमचा फोकस लोकांची कामं करण्यावर आहे. वरळीत तसंच मुंबईत रस्त्यांची कामे जोराने जोरात सुरु आहेत.  मोठ्या प्रमाणावर कचऱ्याच्या संदर्भात कामं सुरु आहेत. कदाचित जानेवारी नंतर मुंबईत कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळणार नाहीत. 

मुंबईतील घरांचा प्रश्न मोठा

मुंबईतील घरांच्या प्रश्नावर देखील आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलंय. मुंबईतील घरांचा प्रश्न मोठा आहे. मुंबईत अनेक ठिकाणी अनेक स्कीम्सच्या माध्यमातून कामं सुरु आहेत. अनेक ठिकाणी अनेक संस्थांसोबत काम करत पुढे जायला लागतंय. त्यामुळे येत्या काळात सिंगल अथॅारीटी म्हणून काम केलं जाईल. 

सर्व शहरातील अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चर्चा

काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांची भेट घेतली. आज सह्याद्रीवर पालिका अधिकाऱ्यांची भेट होणार आहे. फक्त मुंबई नव्हे तर सर्व शहरांच्या सर्व अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चर्चा करतायत. मुख्यमंत्री थेट वॉर्ड ऑफिसर्सशी चर्चा करून कामांना गती देण्याचा प्रयत्न करत असल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.   

राग कंट्रोल करा

सोशल मिडीयावर सध्या शिवसेनेला टार्गेट केलं जातंय या प्रश्नावर आदित्य ठाकरे म्हणालेत, ज्यांनी वचन पाळलं नाही, त्यांना दु:ख असेल. त्यांचं दु:ख मी समजून घेतो. बर्नोल द्या असं मी सांगणार नाही. मात्र, कर्जमुक्ती, दहा रुपयात थाळी किंवा घरं अलाॅट करण्याचा मुद्दा असेल. महाराष्ट्रातील विकासकामांवर आम्ही फोकस करतोय असं देखील आदित्य ठाकरे म्हणालेत. 

महत्त्वाची बातमी ई-चलन जाहले उदंड, वसुली थंडच!

शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांकडून  महाराष्ट्रात चांगली कामं सुरु आहेत. आम्ही महाराष्ट्रात कामं करत राहू. ट्रोल करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. राग कंट्रोल करा, असा सल्ला शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी म्हटलंय. 

WebTitle : aaditya thackeray targets bjp and trollers while speaking to media in mumbai 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.