मुंबई : आरे परिसरातील (Aare area) राहिवाशांवर हल्ले करणाऱ्या बिबट्याला (Panther) पकडण्यासाठी वन विभागाने (forest authorities) विशेष मोहीम (special campaign) सुरू केली आहे. बिबट्याने हल्ले केलेल्या परिसरातील सात ठिकाणी पिंजरे (cage) लावण्यात आले आहेत. वन विभागाने गेल्या आठवड्यात एका मादी बिबट्याला जेरबंद केले आहे.
बिबट्याने महिन्याभरात केलेल्या हल्ल्यांमध्ये सात रहिवासी जखमी झाले आहेत. यामुळे आरे परिसरातील राहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबट्याचे हल्ले वाढल्याने या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी रहिवाशांकडून होऊ लागली, त्यानुसार वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी सापळा लावला.
गेल्या आठवड्यात वन विभागाने एका मादी बिबट्याला जेरबंद केले. हल्ला करणारी हीच मादी असावी असा अंदाज त्यावेळी लावण्यात आला. मात्र त्या मादी बिबट्याला जेरबंद केल्यानंतरही तीन हल्ले झाल्याने हल्ला करणारा दुसरा बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले. आरे परिसरातील ज्या भागात बिबट्याचे दर्शन झाले,ज्या भागात बिबट्याने हल्ले केले तसेच ज्या भागात बिबट्याचा वावर आहे अशी सात ठिकाणी निर्धारित करण्यात आली आहेत.
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या सात ठिकाणी पिंजरे लावून सापळा रचण्यात आला आहे. मात्र 15 दिवस झाले तरी हा बिबट्या काही सापळ्यात सापडलेला नाही. पकडलेल्या मादी बिबट्या हा जेमतेम बारा ते पंधरा महिन्याचा आहे. शोध सुरू असलेला मादी बिबट्या ही देखील पकडलेल्या मादी बिबट्याची बहीण असल्याचे वन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या दोन्ही मादी बिबट्यांची त्यांच्या आई पासून ताटातूट झाली असून ते आरे परिसरात भटकत आहेत.त्यांची आई महानंदा डेरी परिसरात असून त्या परिसरात फिरत असतांना दिसली असल्याचे ही वन अधिकाऱ्याने सांगितले.
महानंदा डेरी परिसरात फिरत असणाऱ्या मादी बिबट्याचे हे दोन्ही बछडे आहेत. त्यातील एका बछड्याला पकडण्यात आले आहे. तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे. हे दोन्ही मादी बिबट्या असून ते बारा ते पंधरा महिने वयोगटातील आहेत. आपल्या आईकडून शिकारी चे प्रशिक्षण घेण्याआधीच या दोन्ही बिबट्यांची आईपासून ताटातूट झाली. त्यामुळे या दोन बिबट्यांचा जंगलात जगण्यासाठीचा सणघर्ष सुरू आहे.ते कोंबड्या,बकऱ्यांच्या शोधात मानवी वस्तीजवळ येतात. अचानक एखादा व्यक्ती समोर येताच त्याला घाबरवण्यासाठी त्याच्यावर हल्ला करतात.
"केजिंग ऑपरेशन सुरू आहे. मुंबई,ठाणे वनविभाग आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान विभागातर्फे संयुक्त कारवाई केली जात आहे. बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून सोबत आसपासच्या पाड्यांमध्ये जनजागृती देखील करण्यात येत आहे."
-गिरीजा देसाई , सहाय्यक वन संरक्षक , ठाणे वन विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.