कलाकारांना ड्रग्स पुरवणाऱ्या सुल्तान मिर्झाला NCB कडून अटक, मुंबईत धडक कारवाई

कलाकारांना ड्रग्स पुरवणाऱ्या सुल्तान मिर्झाला NCB कडून अटक, मुंबईत धडक कारवाई
Updated on

मुंबई : टीव्ही कलाकारांना ड्रग्स पुरवणा-या एका संशयीत वितरकाला केंद्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) अंधेरी येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन प्रकारचे ड्रग्स i आणि रोख रक्कम जप्त करण्यात आल्याची माहिती एका अधिका-याने दिली.

अब्दुल वाहीद ऊर्फ सुल्तान मिर्झा याला अंधेरीतील आझाद नगर परिसरातून नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या (NCB) अधिका-यांनी अटक केली. त्याच्या इनोव्हा कारमधून 750 ग्रॅम गांजा, 75 ग्रॅम चरस, तीन ग्रॅम मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आली आहे. याशिवाय एक लाख 75 हजार रुपयांची रोख रक्कमही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे.

वर्सोवा, लोखंडवाला आणि यारी रोड परिसरात राहणाऱ्या काही टीव्ही कलाकारांना तो अंमली पदार्थ पुरवत असल्याची माहिती त्यांच्या चौकशीतन उघड झाली आहे. वाहिदशी संबधीत काही लिंक हाती लागल्या असून त्या व्यक्तींची लवकरच चौकशी करण्या येणार आहे. वाहिद ड्रग्सच्या काळ्या दुनियेत सुल्तान मिर्झा नावाने प्रसिद्ध आहे.

अभिनेता अजय देवगण याच्या वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई या चित्रपटातील सुल्ताम मिर्झा या भूमिकेवरून प्रभावीत होऊन त्याने हे नाव वापरण्यास सुरूवात केली. त्याच्या मोबाईलची पडताळणी सध्या एनसीबी करत असून त्यावरून त्याच्या ग्राहकांची काही माहिती एनसीबीच्या हाती लागली आहे. अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

sultan mirza arrested by narcotic control bureau in mumbai andheri

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.