Thane News: उल्हासनगरमध्ये नक्की सुरु आहे तरी काय? करबुडव्यांसाठी 6 महिन्यात तिसऱ्यांदा अभय योजना!

उल्हासनगरात अभययोजनेचा तिसरा फेरा; करबुडव्यांसाठी अंतिम संधी | Third round of campaign in Ulhasnagar; Last chance for Karbudas
Thane News: उल्हासनगरमध्ये नक्की सुरु आहे तरी काय? करबुडव्यांसाठी 6 महिन्यात तिसऱ्यांदा अभय योजना!
Updated on

Thane News: चालू वर्षात मालमत्ता कराचे 125 कोटी रुपयांचे टार्गेट समोर ठेवून उल्हासनगर महानगरपालिका आयुक्त अजीज शेख यांनी करबुडव्यांसाठी केवळ 6 महिन्यात तिसऱ्यांदा एका आठवड्याची अभययोजना लागू केली आहे.

Thane News: उल्हासनगरमध्ये नक्की सुरु आहे तरी काय? करबुडव्यांसाठी 6 महिन्यात तिसऱ्यांदा अभय योजना!
Thane Fire News: रेतीबंदर घाटाजवळ कंटेनर कॅबिनला आग

ही अखेरची संधी असून या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा असे आवाहन करतानाच मुदत संपल्यावर संपत्तीची जप्ती,लिलाव अशी कायदेशीर प्रक्रिया हाती घेण्यात येणार असल्याचा इशाराही अजीज शेख यांनी करबुडव्यांना दिला आहे.

महानगरपालिकेचे प्रामुख्याने मालमत्ता कर आणि नगररचना विभाग उत्पन्नाचे स्तोत्र आहेत.दोन वर्षांपूर्वी मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त प्रियंका राजपूत यांनी 110 कोटी रुपयांची वसूली त्यांच्या टीमसोबत केली होती.तर नगररचनाकार प्रकाश मुळे यांनी देखील 56 कोटींची वसूली केली होती.

मात्र मागच्या वर्षी मालमत्ता कराच्या बिलात कॅपिटल व्हॅल्यूचा समावेश केल्याने नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवल्याने केवळ 64 कोटी वसूल झाले होते तर बांधकाम परवान्यांना खीळ बसल्याने नगररचना विभागाची वसुलीची बॅकफूटवर गेली होती.

Thane News: उल्हासनगरमध्ये नक्की सुरु आहे तरी काय? करबुडव्यांसाठी 6 महिन्यात तिसऱ्यांदा अभय योजना!
Thane News : ठाण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नविन बॅनरची चर्चा

त्याअनुषंगाने महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने आयुक्त अजीज शेख यांनी सप्टेंबर 2023 व नोव्हेंबर 2023 अशी दोन वेळेस मालमत्ता कराची दंडात्मक रकम माफ करण्यासाठी एक दिवसाची अभययोजना राबवली होती.या दोन्ही योजनांना मिळून चालू वर्षात 75 कोटी रुपयांची वसूली झालेली आहे.

125 कोटींचे टार्गेट असल्याने 26 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत एका आठवड्याची अखेरची अभययोजना लागू करण्यात आली आहे.या संधीचा लाभ घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे अन्यथा उपायुक्त कर प्रियंका राजपूत व त्यांच्या टीमला कायदेशीर कारवाईचे आदेश देण्यात येतील असा इशारा आयुक्त अजीज शेख यांनी दिला आहे.

Thane News: उल्हासनगरमध्ये नक्की सुरु आहे तरी काय? करबुडव्यांसाठी 6 महिन्यात तिसऱ्यांदा अभय योजना!
Thane Crime News: बदलापूरच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानातून 32 इंची टीव्ही चोरीला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.