Abhishek Ghosalkar Murder Case : शिवसेना (उबाठा) गटाचे नेते आणि माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी (ता.९) गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या संपुर्ण प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
या प्रकऱणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपी मॉरीस नोरोन्हा याचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला अटक केली आहे.दोघांमध्ये असलेल्या पुर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक तपासातून स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगीतले आहे.(,morise noronha)
अभिषेक घोसाळकर यांच्या हत्ये प्रकरणी एमएचबी पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण गुन्हे शाखेच्या युनिट ११ कडे सोपवण्यात आले. पोलिस तपासाला वेग आला असून आतापर्यंत ८ हून अधिक संबंधितांचे जबाब गुन्हे शाखेने नोंदवले आहेत.
यामध्ये मॉरिसची पत्नी, आई, मुलगी, साथीदार आणि प्रत्यक्षदर्शीचा समावेश आहे बलात्काराचा गुन्हाखाली तुरुंगात गेल्यामुळे आरोपी मॉरिस नोरोन्हाच्या मनात अभिषेकबद्दल संतापाची भावना होती. त्यातून ही हत्या केल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.
अंगरक्षकाच्या पिस्तुलचा वापर
अभिषेक घोसाळकर यांच्यावर ज्या पिस्तूलमधून गोळ्या झाडल्या ती पिस्तूल मॉरिसचा खाजगी अंगरक्षक असलेल्या अमरेंद्र मिश्रा याची होती. या बंदुकीचा परवाना उत्तर प्रदेशच्या फुलपूर जिल्हा पोलिसांनी दिला असल्याची माहिती आहे.d
याबाबतची कागदपत्रे आणि ठोस पुरावे प्रशासनाकडे असल्याचे सांगितले जात आहेत.अमरेंद्र मिथ्रा याला शस्त्रास्त्र कायदा 29 ब आणि 30 अंतर्गत अटक केली आहे. तो गेल्या ३ ते चार महिन्यापासून मॉरिसचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता.
पत्नीचा जवाब
मॉरिसच्या पत्नीचा जबाब पोलिसांनी नोंदवला ,त्यामध्ये मॉरिस नरोन्हा एका बलात्काराच्या प्रकरणात ५ महिने तुरुंगात होता.१५ डिसेंबरला तो जामीनावर बाहेर आला होता. अभिषेक घोसाळकर याने मला फसवले, त्याच्यामुळे तुंरुगात जावे लागले असा समज मॉरीसचा झाला होता. पत्नीपुढे तो सातत्याने या बद्दल बोलायचा. अभिषेक घोसाळकरांना सोडणार नाही, असं तो बोलत असे. असे त्याच्या पत्नीने पोलिसांनी सांगीतले.
सर्व अंगाने या प्रकरणाचा तपास सुरु आहे. प्रथमदर्शनी दोघांमध्ये असलेल्या पूर्व वैमनस्यातून ही हत्या झाल्याचे स्पष्ट होत आहे.
राज टिळक रौशन, पोलीस उप आयुक्त (गुन्हे शाखा)
या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. फॉरेन्सिक नमुने गोळा केले आहे. गुन्हे शाखेकडे हे प्रकरण सोपवण्यात आले आहे.
दत्ता नलावडे, पोलीस उप आयुक्त,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.