खालापूरला लवकरच मुबलक पाणी! जलशुद्धीकरण प्रकल्प काम अंतिम टप्प्यात

खालापूरला लवकरच मुबलक पाणी! जलशुद्धीकरण प्रकल्प काम अंतिम टप्प्यात
Updated on


खालापूर : शहरासाठी 35 लाख रुपये खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्प राबवण्यात येत आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आठवडाभरात रहिवाशांना मुबलक पाणी मिळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. 

खालापूर शहराला पाणीपुरवठा करणारी जुनी जल योजना ही कलोते धरणावर आहे; परंतु या योजनेला सुरुवातीपासून समस्येचे ग्रहण लागले आहे. तब्बल आठ वर्षांनी कलोते पाणीपुरवठा योजना सुरू झाली; परंतु वारंवार जलवाहिनी फुटणे, मोटरमध्ये बिघाड आदी कारणांमुळे खालापूर नागरिकाना वारंवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. त्याचबरोबर या ठिकाणी जलशुद्धीकरण यंत्रणा नसल्याने तकलादू ठरली होती. खालापूरकरांची पाणीसमस्या कायमची संपुष्टात यावी, यासाठी नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षा शिवानी जंगम यांनी पाताळगंगा नदीवर दोन योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले होते. दोन्ही योजना कार्यान्वित झाल्यानंतर 35 लाख निधी खर्चून जलशुद्धीकरण प्रकल्प उभा राहिला आहे. दररोज पाच लाख लिटर पाणी शुद्धीकरण क्षमता असलेला हा प्रकल्प असून तासाला 30 हजार लिटर जलशुद्धीकरण होणार आहे. शुद्ध पाणी जलकुंभात चढविण्यासाठी दोन पंप असल्याने अखंडित पाणीपुरवठा खालापूर नागरिकांना होणार आहे. जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाच्या दर्जावर नगरसेवक संतोष जंगम, पाणीपुरवठा सभापती राहुल चव्हाण यांनी लक्ष ठेवले होते. 

खालापूर शहरासाठी एकाच वेळी तीन योजना कार्यान्वित होणार आहेत. त्यामुळे एका यंत्रणेत बिघाड झाल्यास पर्याय असणार आहे. दोन लाख लिटरचे जलकुंभ पूर्ण क्षमतेने दररोज भरण्यात येतील. शुद्ध पिण्याचे पाणी देणार, हा दिलेला शब्द पूर्ण केल्याचे समाधान आहे. 
- संतोष जंगम,
नगरसेवक, खालापूर 

खालापूर शहराचा मुख्य प्रश्‍न शुद्ध पाण्याचा होता. पाण्याअभावी खालापुरातून स्थलांतर होत होते. आता शुद्ध पाणी मिळत आहे. यामुळे खालापूरचा परिपूर्ण विकास झाल्यासारखे आहे. 
- अनिल चाळके,
माजी सरपंच, खालापूर 

Abundant water to Khalapur soon Water purification project work in final stage

---------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.