ठाणे : ठाण्यात रविवारी एका खाजगी कार्यक्रमानिमित्त उपस्थित राहण्यासाठी येत असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील पोलिसांची वाहने एकमेकांवर धडकुन अपघात घडला.
राज्यपाल पुढील वाहनातुन सुखरूप कार्यक्रमस्थळी रवाना झाले असले तरी, या दुर्घटनेत ठाण्याच्या अप्पर जिल्हाधिकारी वैदेही रानडे सुदैवाने बचावल्या. ही दुर्घटना रविवारी (ता.19) सायंकाळी कासारवडवली नजीक घडली.
या अपघातात सुदैवाने कुणीही जखमी झाले नसले तरी, अप्पर जिल्हाधिकारीच्या गाडीसह तीन शासकिय वाहनांचे नुकसान झाले. दरम्यान, राज्यपालांच्या ताफ्यातील पोलिसांची डिव्ही कार (इनोव्हा) वरील चालकाचे नियंत्रण सुटुन हा अपघात घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
web title : Accident of governors vehicles
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.