वरळी पोलिसांनी रविवारी सकाळी वांद्रे-वरळी-सी-लिंकवर 120 किमी वेगाने कार रेसिंग करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. यामध्ये एका मर्सिडीज आणि एका बीएमडब्ल्यूच्या मालकाचा समावेश आहे. रेसिंग दरम्यान, दोन्ही कार पहिल्यांदा एकमेकांना धडकल्या. नंतर बीएमडब्ल्यू नियंत्रणाबाहेर गेली आणि पुढे धवाणाऱ्या वॅगनआरला धडकली.
दरम्यान या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मुंबई पोलिसांनी तारिक चौधरी (वय, 29) आणि शाहबाझ खान (वय, 31) यांना अटक केली आहे.