मुंबई- बदलापूर प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजार करण्यात आले होते. यावेळी त्याला कोर्टाने 26 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कल्याण कोर्टात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
बदलापूर येथील एका नामाकिंत शाळेमध्ये दोन चिमुकली मुलींवर सफाई कर्मचारी असलेल्या अक्षय शिंदेने अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी बदलापूरमध्ये मंगळवारी उद्रेक पाहायला मिळाला होता. याप्रकरणावरून लोकांमध्ये संतापाची लाट आहे. आरोपीला आज कोर्टामध्ये हजर करण्यात आले. यावेळी कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात लोक जमा झाले होते.