Dress Code: जिन्स, टी शर्ट अन् जर्सी घातलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश नाही! हिजाब बंदीनंतर 'या' कॉलेजचा मोठा निर्णय

Acharya Marathe College Chembur: यापूर्वी कॉलेजने हिजाबवर बंदी घातली होती. त्यानंतर काही विद्यार्थी आणि पालकांनी मुंबई हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले होते.
Acharya Marathe College Chembur Dress Code
Acharya Marathe College Chembur Dress CodeEsakal
Updated on

मुंबईतील चेंबूरमध्ये असलेल्या अचार्य मराठे कॉलेजने मोठा निर्णय घेत हिजाब बंदीनंतर जिन्स, टी शर्ट, जर्सी आणि तोकडे कपडे घातलेल्या विद्यार्थ्यांना कॉलेजच्या आवारात प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. कॉलेजने एक पत्रक काढत विद्यार्थ्यांसाठी ड्रोस कोडबाबत सूचना दिल्या आहेत.

जीन्स आणि टी-शर्ट हा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक सामान्य पोशाख आहे, जो काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत लोक परिधान करतात. महाविद्यालयाच्या या निर्णयाचे विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करत आहेत.

Acharya Marathe College Chembur Dress Code
Prasad Lad-Ambadas Danve: 'आम्ही ज्यांना मातोश्री म्हणायचो, त्या...'; प्रसाद लाड यांनी दानवेंवरून उद्धव ठाकरेंना केलं लक्ष्य

कॉलेज प्रशासनाने यासंदर्भात नोटीस जारी केली असून त्यात टी-शर्ट आणि जीन्सवर बंदी घालण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाने नुकतीच महाविद्यालयीन संस्थांमध्ये धार्मिक पोशाखांच्या प्रवेशाबाबतची याचिका फेटाळून लावली होती. विद्यार्थ्यांना धार्मिक पोशाख घालून कॅम्पसमध्ये येऊ देऊ नये, असे याचिकेत म्हटले होते.

कॉलेजने 'ड्रेस कोड आणि इतर नियम' नावाची नोटीस जारी केली आहे. २७ जून रोजी जारी करण्यात आलेल्या या नोटीसमध्ये कॅम्पसमध्ये फाटलेल्या जीन्स, टी-शर्ट, रिलीव्हिंग ड्रेस आणि जर्सी परिधान करण्यास मनाई असल्याचे म्हटले आहे.

या नोटीसवर प्राचार्य डॉ.विद्यागौरी लेले यांचीही स्वाक्षरी आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्मल कपडे घालून यावे आणि सभ्य कपडे परिधान करावेत, असे कॉलेजच्या नोटीसमध्ये म्हटले आहे.

Acharya Marathe College Chembur Dress Code
Mumbai: रस्त्यावर 2 जैन साध्वींना अडचणीत पाहून मुख्यमंत्री मदतीला धावले; तत्परतेचं होतंय कौतुक; Video पाहा

मुली पारंपारिक पोशाख किंवा पाश्चात्य पोशाख घालू शकतात परंतु तुमची धार्मिक ओळख दर्शवणारे कोणतेही कपडे घालू नये असे नोटिशीत म्हटले आहे. विद्यार्थ्यांनी निकाब, हिजाब, बुरखा, गमजा, टोपी आणि बॅज कॉमन रूममध्ये काढून ठेवावे. त्यांनी असे केले नाही तर त्यांना कॉलेजमध्ये फिरता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.