महावितरणचा वीजचोरांना शॉक

वसई ः वीजचोरट्यांवर कारवाई.
वसई ः वीजचोरट्यांवर कारवाई.
Updated on

वसई ः विजेची चोरी करून महावितरण कंपनीचे आर्थिक नुकसान करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी महावितरण विभागाने कंबर कसली असून जानेवारीत १८ लाखांचा दंड वसूल केला आहे. यापुढेही मोहीम अधिक तीव्रपणे राबवली जाणार असल्याचे महावितरण विभागाने स्पष्ट केले आहे.

वसई-विरार भागात एकूण आठ लाखांहून अधिक वीजग्राहक आहेत. ग्राहकांना जास्तीत जास्त चांगली सुविधा देण्यासाठी महावितरण कंपनीकडून काही महिन्यांपूर्वी नवीन विकासाची कामे केली गेली. अधिक क्षमतेची रोहित्रे, जनित्रे लावण्यात आली.

वीजप्रवाह खंडित होणे, तांत्रिक बिघाड होणे यावर मात करण्यासाठी कामे करण्यात आली; परंतु काही ठिकाणी वीजचोरीचे प्रकार वाढीस लागत आहेत. खांबावरून वीज घेण्यासाठी आकडा लावणे, मीटरमध्ये फेरफार करून मोफत विद्युत उपकरणे वापरणे, पाण्यासाठी चोरीछुपे मोटार लावणे, अशा घटना होऊ लागल्या असून याला रोखण्यासाठी गेल्या वर्षी एक पथक तयार करण्यात आले आणि ५२२ वीजचोरांवर धाडी टाकून एक कोटीहून अधिक दंड वसूल करण्यात आला.

यंदा जानेवारीतच तीव्र मोहीम हाती घेत एकूण १३० जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. त्यामुळे वीजचोरीचे प्रकार समोर आले आहेत. वीजचोरीमुळे महावितरण विभागाच्या तिजोरीला फटका बसत आहे.

वीजचोरीमुळे महावितरण विभागाचे आर्थिक नुकसान होते. यासाठी पथक तयार करून पाहणी केली जात आहे. वीजचोरी करताना सापडणाऱ्यांवर कारवाई करून दंड वसूल केला जात आहे. ही मोहीम अधिक तीव्र करून वीजचोरी रोखली जाणार आहे.
अन्वर मिर्झा, अभियंता, 
महावितरण विभाग, वसई

येथे वीजचोरी अधिक
वसई विरार शहरातील जूचंद्र, नागिनदासपाडा, भोईदापाडा, संतोष भुवन, बिलालपाडा, धानिवबाग वाकणपाडा, नवजीवन, गावराईपाडा, वालीव, सातिवली, चंदनसार, मनवेलपाडा, कारगिल नगर यासह अन्य ठिकाणी वीजचोरी अधिक प्रमाणात होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.