नागरिकांचा बेजबाबदार उघड, मुंबईत मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

mask karvaei
mask karvaei
Updated on

मुंबई : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता मुंबई मनपा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी सक्रिय झाली आहे. मुंबई पी उत्तर पालिका विभागातील सहा.आयुक्त संजोग कबरे यांच्या मार्गदर्शनाखाली घन कचरा व्यवस्थापन खाते, पी/उत्तर विभाग यांच्या माध्यमातून कोविड-१९ या वैश्विक महामारीच्या परिस्थितीमध्ये संतोष नगर, दिंडोशी मालाड (पूर्व) परिसरात 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' या अभियानांतर्गत मास्क न वापरणाऱ्या नागरिकांकडून आर्थिक दंड वसूल करण्याची मोहीम अधिक चोखपणे सुरू केली आहे. 

घन कचरा व्यवस्थापन खाते पी/उत्तर विभाग पर्यवेक्षक अजय शिंदे व अधिकारी दत्तात्रय भोगे, संजय बिरे, शेखर खेडेकर, रमेश गोरीवले, राजेंद्र बांदेकर, मुकादम श्रीनिवास कलेड्डा, सुशिल सकपाक यांच्या उपस्थितीत कोरोनाचा संसर्ग पसरू नये, यासाठी कोणती काळजी घ्यावी, याबाबत प्रबोधन करण्यात आले. त्याचप्रमाणे थुंकणे व मास्क न घालणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करून एकूण 30 केसेस मार्फत 6000 रुपये इतकी रक्कम वसूल करण्यात आली. विभागात मास्क घालणारे व थुकंणाऱ्यांवर कारवाई सतत सुरु राहील, असे सहाय्यक आयुक्त संजय कबरे यांनी सांगितले. 

दरम्यान या मोहिमेत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनीही सहभाग नोंदवून मदत केली. साद प्रतिसाद या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप सावंत यांनी सांगितले की, सुशिक्षित नागरिक ही अत्यंत बेजबाबदारपणे वागत आहेत. विविध प्रकारचे दुकानदार ही मास्क वापरत नाहीत. संतोष नगर, गोकुळ धाम, चित्रनगरी रोड, कुरार मधील विविध भाज्यामंडई व मार्केटमध्ये मोठी गर्दी असते. हे लक्षात घेता मास्क वापरणे सध्या अत्यावश्यक बाब झालेली आहे. मात्र, बेजाबदार वर्तणूक करणाऱ्यांना दंड करून समज देणे. पालिकाच नव्हे तर समाजातील सुजाण नागरिकांचीसुद्धा तेवढीच जबाबदारी असून सामुहीकपणे हे पार पाडावे, असे संदीप सावंत यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.