Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी वांद्रे रेल्वे ब्रिजवर कार्यकर्त्याची आत्महत्या

वांद्रे रेल्वे ब्रिजवर गळफास घेऊन जीवन संपविले
Maratha Reservation
Maratha Reservationsakal
Updated on

अंधेरी - मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी आलेल्या सुनिल बाबूराव कावळे या कार्यकर्त्याने बुधवारी (ता.१९) रात्री उशिरा आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बीकेसी कनेक्टर, वांद्रे रेल्वे ब्रिजवर दोरीने गळफास घेऊन सुनिलने जीवन संपविले. याप्रकरणी खेरवाडी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

मृतकाच्या खिशात आत्महत्यापुर्वी लिहीलेली चिठ्ठी सापडली असून त्यात त्याने मराठा समाजासाठी आयोजित केलेला मोर्चा यशस्वी करण्याचे आवाहन केले होते. त्याच्या आत्महत्येची माहिती त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली असून त्याचा मृतदेह शीव रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

सुनिल कावळे हा जालना येथील अंबड, चिकनगावचा रहिवाशी आहे. २४ ऑक्टोंबरला मुंबईत मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एका मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्च्यात सामिल होण्यासाठी सुनिल हा मुंबईत आला होता.

बुधवारी रात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान त्याने वांद्रे येथील पश्‍चिम दुतग्रती महामार्गावरील बीकेसी कनेक्टर, वांद्रे रेल्वे ब्रिजवरील उत्तरवाहिनीवर दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती.

माहिती मिळताच होताच खेरवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. त्याला पोलिसांनी तातडीने शीव रुग्णालयात दाखल केले होते. तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्याच्याकडे पोलिसांना एक बॅग सापडली असून त्यात एक मोबाईल आणि सुसायट नोट पोलिसांनी जप्त केली आहे. या सुसायट नोटवरुन त्याची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले.

ते असे काही करेल असे वाटले नाही. हे सर्व आमच्यासाठी अनेपेक्षित होत असे मृतकाचे नातेवाईक सचिन आगलावे यांनी सांगीतले.गेल्या ५ वर्षापासून ते मराठा संघटनेशी जूळून होते. प्रत्येक आंदोलन,मोर्चात ते सहभागी व्हायचे. शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री दिपक केसरकर भेटायला आले होते. त्यांनी आर्थिक मदत केली. शासकीय मदतीचे आश्वासन दिले आहे असेही आगलावे यांनी सांगीतले.

चिठ्ठीत काय लिहिलयं

यामध्ये त्याने सर्व मराठा समाजाला एकत्र येण्याचे आवाहन केले होते. २४ ऑक्टोंबरला मराठा समाजाचा एक मोर्चा आहे. त्यात सर्वांना एकत्रित झाले पाहीजे. दसरा-दिवाळी सण नेहमीच येत असतात. मात्र त्यापूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे हा मोर्चा यशस्वी करा. मला जे बर वाटलं ते मी केलं, मला मोठ्या मनाने माफ करा, मी क्षमा मागतो असा शेवट या आत्महत्यापुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत त्याने लिहिले.

मराठा आरक्षणासाठी सरकार आग्रही आहे.ज्या ओबीसींना सुविधा आहेत, त्या सर्व मराठ्यांना देण्यात आल्या आहेत. मराठ्यांना आरक्षण मिळेल

- दीपक केसरकर , शालेय शिक्षण मंत्री

ही अत्यंत दुःखद घटना आहे. आरक्षण प्रश्नावर कोणीही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचले नये.

- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

आपल्या मागण्या मंजूर करून घेण्याचा हा योग्य मार्ग नाही. मराठा युवकांच्या आत्महत्या होऊ नये, यासाठी सरकारने तात्काळ पाऊले उचलावी. नाहीतर उद्रेक अटळ आहे.

- विनोद पाटील, समन्वयक, मराठा क्रांती मोर्च

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.