INDIA Alliance March: इंडिया आघाडीच्या 'मी पण गांधी' पदयात्रेत पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड; परिसरात गोंधळाचं वातावरण

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीचा पदयात्रा काढण्यात येत आहे
INDIA Alliance March
INDIA Alliance MarchEsakal
Updated on

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त इंडिया आघाडीचा पदयात्रा काढण्यात येत आहे. इंडिया आघाडीतील जवळजवळ सगळेच घटक पक्षांचे नेते, कार्यकर्ते यामध्ये सहभागी झाले आहेत. मेट्रो सिनेमा ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधीजींच्या पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढण्यात येत आहे.

या यात्रेतील कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं आहे. त्याचबरोबर काहींना ताब्यात घेतलं आहे. यामुळे कार्यकर्ते आणि नेते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी यावेळी जोरजोरात घोषणाबाजी केली आहे.

INDIA Alliance March
Supriya Sule: "निवडणूक आयोगाचा पेपर फुटला का? पटेल, मुंडेंना तारीख आधीच कशी कळली"; सुप्रिया सुळेंचा सवाल

दरम्यान पोलिसांनी अडवल्यानंतर पदयात्रा सुरू झाल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. इंडिया आघाडीच्या या मोर्चासाठी वर्षा गायकवाड, सचिन अहिर आदी नेते पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले.

इंडिया आघाडीच्या पदयात्रेसाठी जमलेले कार्यकर्त आणि पोलिसांची बाचाबाची झाली. पोलिसांकडून काँग्रेस कार्यालय परिसरात जमलेल्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं. त्यानंतर कार्यकर्ते काहीसे आक्रमक झाले. जमावबंदीचे आदेश लागू असल्याचं सांगत पोलिसांकडून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तर या ठिकाणी काहीसे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मेट्रो सिनेमा येथून पदयात्रा निघून फॅशन स्ट्रीट मार्गे हुतात्मा चौक, काळा घोडा, श्यामाप्रसाद मुखर्जी चौक -बाळासाहेब ठाकरे पुतळा, लाल बहादूर शास्त्री पुतळा, रिगल सिनेमा, मादाम कामा रोड मार्ग-कूपरेज डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, कूपरेज राजीव गांधी पुतळा, मंत्रालय समोरून महात्मा गांधी पुतळा येथे थांबणार होता. मात्र या पदयात्रेला परवानगी नसल्याने पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखलं आणि काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे.

INDIA Alliance March
Ajit Pawar: 'अकारण कोणाला नोटीस येत नाही', अजित पवारांचा रोहित पवारांना टोला.. काका पुतण्या वाद चिघळणार?

संपूर्ण देशात सध्या 'फोडा आणि राज्य करा' इंग्रजांचं राजकारण भाजप करत आहे. मुंबई आणि महाराष्ट्रात ज्या विद्वेषाच्या घटना घडत आहेत. याचा निषेध करत समाजात सद्‍भावनेचा विचार रूजवण्याची गरज आहे. यामुळे I.N.D.I.A. आघाडीकडून महात्मा गांधीलाल बहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त 'मी पण गांधी' हा नारा देण्यात येत आहे. या पदयात्रेला काँग्रेसच्या अध्यक्षा प्रा. वर्षा गायकवाड देखील उपस्थित आहेत.

इंडिया आघाडीच्या काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलं आहे. तर या पदयात्रेला परवानगी नसल्याचे पेलिसांनी म्हटलं आहे.

INDIA Alliance March
Accident News: गाढ झोपेत असतानाच मजुरांवर काळाचा घाला; ट्रकने दहा मजुरांना चिरडलं, 4 जणांचा मृत्यू तर 3 गंभीर जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.