महत्त्वाची बातमी : मुंबई हायकोर्टातील प्रत्यक्ष सुनावणी सोमवारपासून होणार सुरु

महत्त्वाची बातमी : मुंबई हायकोर्टातील प्रत्यक्ष सुनावणी सोमवारपासून होणार सुरु
Updated on

मुंबई : तब्बल पाच महिन्याच्या कालावधीनंतर मुंबई उच्च न्यायालयातील केवळ फौजदारी याचिकांवरील प्रत्यक्ष सुनावणी येत्या 31 तारखेपासून म्हणजेच सोमवारपासून सुरु होणार आहेत. यासंबंधीचे निर्देश न्यायालय प्रशासनाने जारी केले असून सुनावणीवेळी न्यायालयात मास्क वापरणे सक्तीचे केले आहे.

तूर्तास प्रायोगिक तत्वावर 31 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरपर्यंत फौजदारी दाव्यांंवर  प्रत्यक्ष सुनावणी सुरू होत आहे. मुख्य न्यायमूर्तींंनी याबाबत परिपत्रकद्वारे निर्देश दिले आहेत.  न्या. पी बी वार्ले आणि न्या व्ही जी बिश्त, न्या. एस एस जाधव आणि न्या एन जे जमादार, न्या. अजय गडकरी, न्या. पी डी नाईक यामध्ये काम पाहणार आहेत. दोन खंडपीठ आणि दोन एकल न्यायाधीशांचा यामध्ये समावेश आहे.

कोविड 19 च्या पाश्वभूमीवर या सुनावणीसाठी विशेष पध्दती निश्चित करण्यात आली आहे. याबाबतचा तपशील उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. यानुसार अनुक्रमणिकेनुसार एकाच प्रकरणातील वकिलांना सुरक्षा नियम पाळुन प्रवेश दिला जाणार आहे. यामध्ये मास्क वापरणे बंधनकारक आहे. अन्य वकिलांनी तोपर्यंत प्रतिक्षा रुममध्ये बसावयाचे आहे. जर एखाद्या पक्षकाराने हजर राहण्यासाठी नकार दिला तर ती सुनावणी ऑनलाईन होईल असेही सूचनापत्रात स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊनमध्ये सर्व न्यायालयांंचे काम ऑनलाईनवर सुरु आहे. मात्र नियमित काम सुरू करण्याची मागणी वकील वर्गाकडून वेळोवेळी करण्यात आली होती.

( संपादन - सुमित बागुल )

actual hearing on cases at mumbai high court will start from 31 September

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.