Mumbai: अदानी एअरपोर्ट्स होल्डिंग्ज लि. (एएएचएल) या जागतिक स्तरावरील वैविध्यपूर्ण अदानी ग्रुपची प्रमुख कंपनी अदानी एंटरप्राइजेजच्या उपकंपनीने विमानतळ इकोसिस्टमसाठी अग्रगण्य डिजिटल परिवर्तन प्लॅटफॉर्म 'एव्हियो' लाँच केले आहे.
भारतातील अद्वितीय, सर्वसमावेशक डिजिटल उपक्रम एव्हियोची प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी एव्हिएशन समुदायाला एकत्र आणण्याची महत्त्वाकांक्षा आहे.
विमानतळ भागधारकांना रिअल-टाइम डेटा उपलब्ध करून देण्यासह सक्षम करत प्रवाशांना विमानतळावरील माहिती सुलभपणे उपलब्ध होऊ शकते, जसे सुरक्षा तपासणी, वेटिंग टाइम, गेट चेंज आणि बेल्टवरील बॅग्ज अशा पैलूंबाबत अपडेट्स मिळू शकतात.
या उल्लेखनीय उपक्रमासह एएएचएलचा एव्हिएशन समुदायाला सेवा देण्याचा आणि विमानतळ कार्यसंचालन व्यवस्थापन व प्रवासी अनुभवासाठी नवीन मानक स्थापित करण्याचा मनसुबा आहे.