Dharavi Redevelopment: अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या झोपडपट्टीचा विकास, धारावीच्या पुनर्विकासाला मंजुरी

मुंबईच्या धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अदानी समूहाला मंजुरी दिली आहे.
Gautam Adani Dharavi Redevelopment
Gautam Adani Dharavi RedevelopmentSakal
Updated on

Dharavi Redevelopment: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचे चित्र लवकरच बदलणार आहे. मुंबईच्या धारावीचा पुनर्विकास करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अदानी समूहाला मंजुरी दिली आहे. आता लवकरच अदानी समूह धारावी पुनर्विकास प्रकल्प सुरू करू शकतो. धारावी हे आशियातील सर्वात दाट लोकवस्तीचे ठिकाण आहे. त्याची लोकसंख्या सुमारे 8 लाख आहे.

आता महाराष्ट्र सरकारनेही या दाट लोकवस्तीच्या सुशोभिकरणाचे काम अदानी समूहाला दिले आहे. प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एसव्हीआर श्रीनिवास यांनी सांगितले की, पुनर्विकास प्रकल्पासाठी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

आता लवकरच पत्रही दिले जाणार आहे. त्यानंतर अदानी समूह या प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात करेल. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 23,000 कोटी रुपये खर्च येणार आहे.

Gautam Adani Dharavi Redevelopment
SBI Bank Hikes MCLR: SBIचा कर्जधारकांना मोठा झटका! EMI मध्ये होणार 'इतक्या' टक्क्यांची वाढ

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी बदलणार

धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अदानी समूहाने धारावी झोपडपट्टीच्या पुनर्बांधणीसाठी बोली लावली होती. त्यावेळी अदानी समूहाने यासाठी 5,069 कोटी रुपयांची बोली लावली होती.

डीएलएफने 2,025 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. धारावी हा आशिया खंडातील सर्वात दाट लोकवस्तीचा भाग आहे. येथील शिक्षण व स्वच्छतेची स्थिती अत्यंत वाईट आहे. आता मंजुरी मिळाल्यानंतर अदानी इन्फ्रा हे सुशोभीकरणाचे काम करणार आहे.

Gautam Adani Dharavi Redevelopment
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

1997 मध्ये पहिल्या योजनेची ब्लू प्रिंट

या योजनेत झोपडपट्टीवासीयांना घरे देण्याची योजना सर्वप्रथम 1997 मध्ये मुकेश मेहता यांनी केली होती. 2003-04 मध्ये राज्य सरकारने धारावीचा विकास करण्याची योजना आखल्यावर या दिशेने काम सुरू झाले. यासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी 2004 मध्ये कृती आराखडा मंजूर केला होता.

एकनाथ शिंदे सरकारने ऑक्टोबर 2022 मध्ये नवीन निविदा जारी केल्या. 2019 साली उद्धव ठाकरे सरकारने या प्रकल्पाची शेवटची निविदा रद्द केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.