Adani Group on Dharavi Project : "मविआच्या कार्यकाळातच अंतिम..."; अदानी समुहाकडून धारावीच्या लिलाव प्रक्रियेबाबत स्पष्टीकरण

धारावीच्या पुनर्विकास प्रक्रियेबाबत चुकीची माहिती दिली जात असल्याचा दावाही यावेळी अदानी समुहानं केला आहे.
Adani Dharavi Project
Adani Dharavi ProjectSakal
Updated on

मुंबई : धारावीच्या पुनर्विकासाचं काम अदानी समुहाला मिळालं आहे. पण यावर उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला आहे. यासाठी त्यांनी आज धारावी ते बीकेसीतील अदानी समुहाचं कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. तिथेच सभा घेत नागरिकांना संबोधितही केलं.

तसेच मुंबई अदानींच्या घशात घालण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप केला. ठाकरेंच्या या आरोपांवर आता अदानी समुहानं निवेदन सादर करत स्पष्टीकरण दिलं आहे. (Adani Group Clarification on Dharavi auction process due to Uddhav Thackeray Dharavi Bachav Morcha)

मविआच्या काळातच

अदानी समुहानं निवेदनात म्हटलं की, "धारावी प्रकल्प अदानी समुहाला निष्पक्ष, खुल्या, आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धात्मक लिलावातील बोली प्रक्रियेद्वारे देण्यात आला आहे. उलट महाविकास आघाडी (MVA) सरकारच्या कार्यकाळात यातील निविदा अटींना अंतिम रूप देण्यात आलं होतं, हे इथं लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. (Latest Marathi News)

Adani Dharavi Project
BJP on Thackeray: "'ठाकरे डिमांड रुपया' मिळाला की 'यूटर्न' घेण्यास मोकळे"; भाजपची ठाकरेंवर टीका

अटी बदलण्यात आल्याच्या आरोपावर दिलं स्पष्टीकरण

त्याचबरोबर अदानी समुहाकडून निविदेच्या अटी बदलण्यात आल्याच्या आरोपांवरही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. सर्व बोली लावणाऱ्यांना माहीत असलेल्या जबाबदाऱ्या आणि अंतिम अटी या निविदा प्रक्रियेनंतर बदलण्यात आलेल्या नाहीत.

त्यामुळं कोणतंही विशेष फायदे असल्याचा दावा करणं चुकीचं आहे. प्रकल्पाच्या काही पैलूंबद्दल चुकीची माहिती पसरविण्याचा प्रयत्न केला जात आहे हे दुर्दैवी आहे, असंही अदानी समुहानं म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.