Samruddhi Mahamarg : 'समृद्धी'वर अपघात रोखण्यासाठी उपाययोजना; महामार्गाच्या दुतर्फा आता...

Samruddhi Mahamarg
Samruddhi Mahamargsakal
Updated on

मुंबई : महाराष्ट्राच्या दोन टोकाला जोडणारा ६ लेन समृद्धी महामार्गाचा नागपुर - शिर्डी पहिला टप्पा सुरू होऊन पाच महिने झाले असून, अपघातांची संख्या वाढली आहे. वाहतुक नियमांचे उल्लंघन, नादुरूस्त वाहन, निकृष्ट टायर, डुलकी लागने यासह विविध प्रकारच्या कारणांमुळे अपघात आणि मृत्युंची संख्या रोखण्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळापुढे आव्हान निर्माण झाले आहे.

Samruddhi Mahamarg
Nitesh Rane : 'नितेश राणे हे भाजपचा नाच्या आहेत', राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची जहरी टीका

त्यामुळे अपघात होऊन वाहन रस्त्यांच्या खाली जाऊ नये यासाठी आणि चालकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फो सेफ्टी रेलिंग लावण्याचे काम एमएसआरडीसीने हाती घेतले आहे.

समृद्धी महामार्गाच्या इंजिनीयरींग प्रमाणे, सेफ्टी रेलिंग फक्त एकूण ६ लेनच्या कोपऱ्यावर लावण्यात आली होती. मात्र, वाहतुकदारांकडून बेदरकारपणे वाहन चालवण्यात येत असल्याने आणि सर्वाधीक अपघात लेन कटिंग करून अपघातास कारणीभूत ठरत असल्याने आता समृद्धी महामार्गावरील दोन्ही बाजुच्या तीन-तीन लेनच्या दोन्ही बाजुला सेफ्टी रेलिंग लावण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Samruddhi Mahamarg
CM एकनाथ शिंदे : रिक्षाचालक ते मुख्यमंत्रीपदापर्यंतचा 'त्यांचा' प्रवास अद्भुतच

या रेलिंगवर सिफ्लेक्टर लावल्या जाणार असून, दोन्ही बाजुच्या रिफलेक्टरमूळे चालकाला वाहन चालवतांना रस्त्यांचा अंदाज घेता येणार आहे. शुक्रवारी शिर्डी - भरवीर या ८० किलोमीटरच्या दुसऱ्या टप्याचे लोकार्पण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडले असून, वाहतुदारांसाठी महामार्ग सुर करण्यात आला आहे. यादरम्यान शिर्डीपासून पुढे महामार्गावर सेफ्टी रेलिंग लावण्याचा काम वेगाने सुरू असल्याचे दिसून आले आहे.

११ डिसेंबर ते ३० एप्रिल पर्यंत महामार्ग पोलीस विभागाने समृद्धी महामार्गाच्या अपघाताच्या आकडेवारीनुसार टायर फुटल्याने एकूण ५५ अपघात झाले तर ९ मृत्यु झाले आहे. त्याप्रमाणे, डुलकी लागल्यामूळे ९८ अपघात ९ मृत्यु, वाहनांमधील तांत्रीक कारणांमूळे १५ अपघात, ओव्हर स्पिडींगमूळे ६८ अपघात ११ मृत्यु, वन्यजीव प्राण्यांमूळे ४८ अपघात १ मृत्यु, वाहन पार्किंग आणि ब्रेकडाऊनमूळे ११ अपघात १ मृत्यु, इतर प्रकरणांमध्ये ६३ अपघात ८ मृत्यु असे, एकूण ३५८ अपघात आणि ३९ मृत्यु झाल्याचे दिसून येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.