Aditya Thackeray Dasara Melava: राज्यातील विधानसभा निवडणूक कधी लागणार? याची राजकीय नेते, कार्यकर्ते तसंच नागरिक आतुरतेनं वाट पाहात आहेत. पण आचारसंहिता अदानींच्या कामांचे जीआर निघत नाहीत तोपर्यंत लागणार नाही, असं आपल्याला अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे, असा दावा युवासेनेचे प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबईच्या शीवतीर्थावरील दसरा मेळाव्यात ते बोलत होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, "राज्यात सर्वजण म्हणत आहेत की आचारसंहिता केव्हा लागणार? पण अदानींच्या कामांचे जीआर जोपर्यंत निघत नाहीत, तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही, असं मला अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे"
महाराष्ट्राची लूट रोखण्यासाठी ही लढाई आहे. नुसता भ्रष्टाचार हे सरकार करतंय, रस्त्यात भ्रष्टाचार सुरु आहे. एक महिन्यात आमचं सरकार येत आहे. त्यामुळं आता शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी तयार रहायला हवं, असं आवाहनही यावेळी आदित्य ठाकरे यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.