कोल्हापूरच्या जनतेचा 'मविआ' सरकारवर विश्वास; आदित्य ठाकरे

अयोध्या दौऱ्याची तारीख लवकरच जाहीर करेन-आदित्य ठाकरे
Aditya Thackeray
Aditya Thackeray esakal
Updated on

मुंबई: कोल्हापूरच्या (Kolhapur) जनतेने महाविकास आघाडीवर विश्वास ठेवून उत्तर मतदारसंघासाठी (Kolhapur North Bypoll election) झालेल्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांना प्रचंड मतांनी निवडून दिले. कोल्हापूरातल्या (Kolhapur) जनतेने विकासाला निवडले आहे याबद्दल कोल्हापूरकरांचे त्यांनी मनापासून आभार मानले. तसेच मे महिन्यातील पहिल्या आठवड्यात दर्शनासाठी अयोध्येला जाणार असल्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Aditya Thackeray
कोल्हापूरचा निकाल महाविकास आघाडीच्या एकजूटीचा विजय ;आदित्य ठाकरे

यावेळी ते म्हणाले, कोल्हापूर तसेच महाराष्ट्राचा विकास निश्चितपणे करणार आहोत. संघर्षाचा काळ आता संपला आहे. आशीर्वाद घेण्यासाठी लवकरच अयोध्येला जाणार असून याची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Aditya Thackeray
कोल्हापूर उत्तरमध्ये पराभूत झाल्यानंतर सत्यजीत कदम यांची प्रतिक्रिया

कोल्हापूरविषयी बोलताना ठाकरे म्हणाले, कोल्हापूरच्या जनतेने विकास कोण करतयं हे ओळखल आहे. शिवसेनेने दादरमध्ये हनुमान जयंती निमित्त महाआरतीचे नियोजन केले आहे. यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, आम्ही वर्षानुवर्ष महाआरती करत आलो आहोत. आता एक दोन पक्ष महाआरती करत आहेत म्हणून याची चर्चा होताना दिसते आहे. कोरोना काळानंतर नागरीक उत्साहाने सण-समारंभ साजरे करत आहेत असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()