Aditya Thackeray : पक्ष फोडून भाजपला काय मिळाले; आदित्य ठाकरे, सिनेट निवडणुकीवरूनही टीका

बाकीचा तर दुसऱ्या पक्षातून आयात केलेलाच माल आहे. तोही इतर पक्षांनी बाद केलेला आहे, अशी चपराकही त्यांनी लगावली.
aditya thackeray said on the ban on the Senate elections bjp party politics
aditya thackeray said on the ban on the Senate elections bjp party politicsesakal
Updated on

मुंबई : ‘‘दोन पक्ष, एक परिवार फोडून राज्यात एक घटनाबाह्य सरकार आणले. पण त्यात भाजपला आणि भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना काय मिळाले,’’ असा टोकदार सवाल उपस्थित करत राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणावर ठाकरे गटाचे नेते, आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली.

ज्यांना मूळचे भाजप नेते म्हणावेत, असे फक्त पाचसहा जणच आहेत. बाकीचा तर दुसऱ्या पक्षातून आयात केलेलाच माल आहे. तोही इतर पक्षांनी बाद केलेला आहे, अशी चपराकही त्यांनी लगावली.

नाशिक दौऱ्यासाठी रवाना होण्यापूर्वी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. आजचे राजकारण केवळ सत्ताकारण आहे. निष्ठावंतांच्या जोरावर मजबूत झालेल्या भाजपमध्ये आता बाहेरचेच चेहरे जास्त दिसतात, असा घरचा आहेर भाजप नेते नितीन गडकरी यांनी नुकताच स्वपक्षालाच दिला.

या पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नावर ते म्हणाले की, भाजपचे अनेक लोक आता हेच सांगत आहेत. पक्ष फोडून, परिवार फोडून आलेल्या सरकारमध्ये भाजपला काय मिळाले. पाचसहा जण वगळले तर सरकारमध्ये सर्व बाहेरून आलेले, इतर पक्षांनी नाकारलेलेच लोक आहेत. त्यामुळे इतके सगळे करून महाराष्ट्राला मागे नेताना महाराष्ट्र भाजपला काय मिळाले, हा विचार त्यांचे कार्यकर्तेही कधी ना कधी करणारच आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका रद्द झाल्या, यावर देखील त्यांनी टीका केली. ज्या पद्धतीने निवडणूक स्थगित झाली त्यावरून यांची तयारी नाही हेच दिसत असल्याचेही ते म्हणाले.

कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सिनेट निवडणुका स्थगित होणे हे अत्यंत धोकादायक आहे. अशाच पद्धतीने लोकसभेच्या निवडणुकाही हे लोक स्थगित करू शकतात. त्यामुळे देशात लोकशाही नाही असेच समजून पुढची वाटचाल होणार आहे.

- आदित्य ठाकरे, युवासेना प्रमुख

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()