Mumbai News : उध्दव ठाकरे यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे यांचा कल्याण दौरा

पक्षफुटीनंतर पहिल्यांदा आदित्य यांचे कल्याण लोकसभेत पाऊल
aditya thackeray visit to kalyan after uddhav thackeray shiv sena politics
aditya thackeray visit to kalyan after uddhav thackeray shiv sena politicsSakal
Updated on

डोंबिवली - शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकताच कल्याण लोकसभेचा दौरा केला आणि गाजवला देखील. उद्धव ठाकरे यांच्या नंतर आता त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे कल्याण मध्ये गुरुवारी येत आहेत. पक्ष फुटी नंतर ते देखील पहिल्यांदाच कल्याण लोकसभेत आपले पाऊल ठेवणार आहेत.

सध्याच्या घडीला कल्याण मध्ये भाजप - शिवसेना शिंदे गटा मध्ये धुसफूस सुरू असताना आदित्य ठाकरे कोळसेवाडी परिसरात येत असल्यामुळे या सर्व घडामोडींवर ते काय भाष्य करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्षफुटीनंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे किंवा त्यांचे सुपुत्र युवा नेते आदित्य ठाकरे यांनी कल्याण लोकसभेचा दौरा केला नव्हता.

विधानसभा अध्यक्ष यांनी शिवसेना हि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असा निकाल देताच उद्धव यांनी राज्यात संपर्क दौरा आयोजित करत त्याची सुरवातच शिंदे यांचा बालेकिल्ला तथा शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातून केली.

ठाकरे यांचा हा दौरा चांगलाच गाजला. यानंतर नुकतेच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत हे देखील डोंबिवली दौऱ्यावर येऊन गेले आहेत. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आपला निशाणा साधल्याचे पहायला मिळाले आहे.

यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना प्रमुख व माजी मंत्री आदित्य ठाकरे हे कल्याण येथे येत्या गुरुवारी 8 फेब्रुवारीला येत आहेत. कल्याण कोळसेवाडी येथील शाखेला ते भेट देणार आहेत. सायंकाळी 6 वाजता ते येणार असून जास्तीत जास्त शिवसेना ,महिला आघाडी व युवासेना पदाधिकारी यांनी शिवसैनिक कार्यकर्त्यांसह उपस्थित रहावे असे आवाहन शिवसैनिकांनी केले आहे.

आदित्य हे कार्यकर्त्यांशी संवाद साधून राजकीय परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. पहिल्यांदाच कल्याण लोकसभेत आदित्य ठाकरे येत असल्याने कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती शाखेवरती ठेवली महत्वाची नियोजन बैठक. मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत आदित्य ठाकरे यांचे स्वागत करणार असल्याची ठाकरे गटातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माहिती दिली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजप आणि शिंदे गटात सध्या धुसफूस सुरू आहे. एका जमिनीच्या वादातून भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळी झाडली आहे.

या घटनेमुळे येथील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी पक्षातील कल्याण येथील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभुमीवर शिवसेना नेते आदित्य कल्याण येथे येऊन आता शिवसैनिकांना काय मार्गदर्शन करतात? सत्ता संघर्षावर ते काय भाष्य करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून सुभाष भोईर यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. त्यातच उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावेळी कल्याण लोकसभेचे ठाकरे गटाचे उमेदवार म्हणून आदित्य यांच्या नावाची चर्चा झाली होती.

यानंतर ठाकरे गटाचे दौरे या लोकसभा मतदारसंघात वाढले असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच संजय राऊत डोंबिवली येथे येऊन गेले आहेत. त्यात आता आदित्य देखील कल्याण मध्ये येत आहेत. यामुळे ठाकरे गट येथे या मतदारसंघात कोणता उमेदवार देतात याची जोरदार चर्चा सुरू आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.