Tansa Dam : तानसा धरण भरण्याची शक्यता लक्षात घेता गाव/पाड्याना दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

शहापुर तालुक्यातील धरण क्षेत्रात गेल्या3/4 दिवसापासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने भातसा,मोडकसागर व तानसा धरणाच्या पाण्याचा साठा वाढला असून पाऊस असाच सुरू राहिला तर तानसा धरण भरून वाहण्याची दाट शक्यता आहे.
Tansa Dam
Tansa DamSakal
Updated on

खर्डी,ठाणे : शहापुर तालुक्यातील धरण क्षेत्रात गेल्या3/4 दिवसापासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने भातसा,मोडकसागर व तानसा धरणाच्या पाण्याचा साठा वाढला असून पाऊस असाच सुरू राहिला तर तानसा धरण भरून वाहण्याची दाट शक्यता आहे.

बृहनमुंबई महानगरपालिकेच्या तानसा धरणाची पातळी 127.51 मी.मी. टिएचपी इतकी आहे. तानसा धरण ओसंडून (Overflow) वाहण्याची पातळी 128.63 मी.टीएचडी इतकी असून सद्या 126 मीटर इतके पाणी आहे. तानसा धरण परिसरात सतत पर्जन्यवृष्टी होत असून, धरण परिसरातील सध्याचे पावसाचे प्रमाण लक्षात घेता तानसा धरण लवकरच भरुन वाहण्याची शक्यता आहे.

तरी तानसा धरणाखालील व तानसा नदीलगतच्या/आजूबाजूच्या परिसरातील शहापूर तालुक्यातील भावसे, मोहिली, वावेघर, अघई, टहारपूर, नवेरे, वेलवहाळ, डिंबा व खैरे. भिवंडी तालुक्यातील बोरशेती, एकसाल, चिंचवली, कुंडे, रावडी, अकलोली, वज्रेश्वरी, महाळूंगे व गणेशपुरी, वाडा तालुक्यातील निभावली, मेट, व गोरांड, वसई तालुक्यातील खानिवडे,

घाटेघर, शिरवली, अदने, पारोल, अंबोडे, भटाणे, साईवान, काशीद कोरगाव, कोपरगाव, हेडावडे व चिमणे या गाव, वाड्या, पाड्यातील रहिवाश्यांनी याची नोंद घ्यावी. प्रशासन सर्व प्रकारच्या सुरक्षित उपाययोजनांसाठी सज्ज असून प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे जनतेने पालन करावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम परदेशी यांनी केले आहे.भातसा धरण 60 टक्के भरले असल्याने मुंबई करांचे पाण्याचे टेन्शन मिटले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.