मुंबईः कोरोना पार्श्वभूमीवर यंदा नीटचा निकाल विलंबाने जाहीर झाला. नीटचा निकाल जाहीर झाल्यानंतर सीईटी सेलने वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला सुरूवात केली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी 5 नोव्हेंबरपासून नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. या प्रवेश प्रक्रियेची पहिली गुणवत्ता यादी 15 नोव्हेंबरला जाहीर करण्यात येणारेय. मात्र ही प्रक्रिया मराठा आरक्षणाविना सुरु झाली आहे. ऑल इंडिया कोट्यातील पहिली फेरी झाल्यानंतर राज्याची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होते. त्यामुळे विद्यार्थी संभ्रमात आहेत.
मेडिकल (एमबीबीएस) आणि दंतवैद्यकीय (बीडीएस) अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या प्रक्रियेत राज्याची सर्वसाधारण पहिली गुणवत्ता यादी 13 नोव्हेंबरला जाहीर होईल. तर मेडिकल प्रवेशाची सेंट्रलाइज ऑल इंडिया कोट्यातील पहिली फेरी ही 6 नोव्हेंबरला सुरू होऊन 12 नोव्हेंबरला पूर्ण होणारेय.
ऑल इंडिया कोट्यातील पहिली फेरी झाल्यानंतर राज्याची गुणवत्ता यादी १३ तारखेला जाहीर होईल. यामुळे कोणत्या प्रक्रियेला प्राधान्य द्यायचं, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. त्यात नीटचा निकाल वाढल्यामुळे राज्याच्या यादीत नेमकं कोणतं स्थान आहे यातही विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ आहे. मेडिकल कॉलेजमध्ये १५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश हे ऑल इंडिया कोट्यातून केले जातात.
या कोट्यातील प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर राज्याची गुणवत्ता यादी जाहीर होईल. त्यामुळे अखिल भारतीय कोट्यातून प्रवेश घ्यायचा की राज्याच्या कोट्यातून प्रवेश घ्यायचा याचा निर्णय घेणं अवघड झालं. त्यामुळे राज्यानं गुणवत्ता यादी ऑल इंडिया कोट्याची पहिली फेरी होण्यापूर्वी जाहीर करावी, अशी मागणी आता संभ्रमात असलेल्या मेडिकल विद्यार्थ्यांनी केली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी सेलमार्फत 5 नोव्हेंबरला सकाळी 11 वाजल्यापासून ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. https://cetcell.net/UGNEET 2020 या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना नाव नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करता येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील माहितीपत्रक सेलने संकेतस्थळावर जाहीर केले आहे. यामध्ये उपलब्ध जागांची माहितीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. 6 ते 13 नोव्हेंबरपर्यंत एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आपला पसंतीक्रम ऑनलाईन भरायचा आहे. एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची तात्पुरती यादी 13 नोव्हेंबरला तर पहिली गुणवत्ता यादी 15 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता जाहीर करण्यात येईल.
यादीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 20 नोव्हेंबरपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे. बीएएमएस, बीएचएमएस, बीयूएमएस, बीपीटीएच, बीओटीएच, बीएएसएलपी, बीपी ऍण्ड ओ, बीएस्सी नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील सविस्तर माहिती www.mahacet.orgया संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असल्याची माहिती सीईटी सेलकडून सांगण्यात आली आहे.
Admission process medical course started without Maratha reservation
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.