निशब्द करणारं वास्तव, शनिवारी अस्वस्थ वाटू लागले, रविवारी रात्री कोरोनाने साधला डाव...

निशब्द करणारं वास्तव, शनिवारी अस्वस्थ वाटू लागले, रविवारी रात्री कोरोनाने साधला डाव...
Updated on

मुंबई : मुंबई पोलिसांच्या वाहतुक विभागात कार्यरत पोलिसाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. मुंबई पोलिस दलातील कोरोनाबाधीत पोलिसांचा आकडा हजाराच्या पार गेलाय. तर राज्यात आतापर्यंत एक हजार 809 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे.

मुंबईत वाहतुक पोलिस विभागात कार्यरत पोलिल हवालदाराचा रविवारी मध्यरात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. ते भायखळा वाहतुक प्रशिक्षण विभागात कार्यरत होते. वरळी येथील राहणा-या या पोलिस हवालदाराला शनिवारी अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना आग्रीवाडा येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे शनिवारी त्यांच्यावर कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल रविवारी आला. त्यात त्यांना कोरोनाची लागणी झाल्याचे निष्पन्न झाले.

रविवारी रात्री त्यांची स्थीती आणखी गंभीर झाल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.  कोरोनामुळे मृत्यू झालेला मुंबई वाहतुक विभागातील हा तिस-या पोलिसाचा मृत्यू आहे.

मुंबईतील कोरोना बाधीत पोलिसांचा आकडा शनिवारी 935 होता. रविवारी त्यात आणखी 69 पोलिसांची भर पडली असून हा आकडा 1004 वर पोहोचला आहे. एका वरिष्ठ अधिका-याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील 18 पोलिसांना आपला जीव गमवावा लागला आहे.

तसेच राज्यात 194 पोलिस अधिकारी आणि 1 हजार 615 पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यावर उपचार  सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. राज्यात एकूण 3 हजार 717  रिलिफ कँप आहेत. तर जवळपास3 लाख, 54 हजार 195  नागरीकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोरोनाच्या संसर्गामुळे मृत्यू झाल्यास पोलिसांच्या कुटुंबियांना 65 ते 70 लाख रुपये आर्थिक मदत दिली जाणार असून त्याचप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी मिळणार आहे. सुदैवाने राज्यात 678 पोलिस कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यात 52 अधिका-यांचा समावेश आहे.

मुंबईत आतापर्यत सुमारे दोनशेहून अधिक कोरोनाबाधित पोलिस कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. त्यात एका उपायुक्त दर्ज्याच्या अधिका-याचाही समावेश आहे. मुंबईतील वाकोला येथे पोलिसांसाठी विशेष कोविड केअर सेंटर स्थापन करण्यात आले असून मरिन ड्राईव्ह येथील पोलिस जीमखान्यात ही कोविड केअर सेंटर उभे करण्यात येणार आहे. 

admitted on Saturday lost life on sunday sad reality of corona in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.