मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे काही चमत्कारिक फायदे

मिठाच्या पाण्याने आंघोळ करण्याचे काही चमत्कारिक फायदे
Updated on

मुंबई : मीठ हा आपल्या जेवणातला अविभाज्य घटक आहे. मिठाशिवाय जेवणाला चव येत नाही. मात्र मीठ खाल्ल्यामुळे ब्लड प्रेशर वाढतं असं काही लोकं म्हणतात. त्यामुळे अनेकजण मीठ खाताना काळजी देखील घेतात. मात्र मीठ तुमच्या आरोग्यासाठी महत्वाचं आहे. मिठात अनेक असे गुण असतात जे आपल्या शरीराला फायद्याचे असतात. असेच काही मीठ वापरण्याचे फायदे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्यामुळे तुमच्या शरीराला भरपूर फायदे होतात. हो हे खरं आहे. मिठात सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, बोरॉन, सिलिकॉन अशा प्रकारचे काही घटक असतात जे तुमच्या शरीराला महत्वाचे असतात. मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्यामुळे त्वचेचे रोग दूर होतात, थकवा निघून जातो, अर्थ्राइटिस कमी होतो, वजन देखील कमी होण्यास मदत होते. मिठाचे अजूनही काही फायदे आहेत आपण ते जाणून घेऊया. पण त्याआधी जाणून घेऊया कोणतं मीठ आहे योग्य याबद्दल. 

बाजारात रासायनिक पदार्थ असलेले मिठाचे अनेक प्रकार असतात. मात्र हे आपल्या शरीरासाठी घातक असतात. त्यामुळे 'ईप्सम सॉल्ट' वापरणं किंवा 'समुद्री मीठ' मानवी शरीरासाठी फायदेशीर आहे. यात कोणत्याही प्रकारचे रासायनिक पदार्थ नसतात. या मिठात सोडियमचं प्रमाणही कमी असतं. 

काय आहेत मिठाचे फायदे ?

रुमेटाईड अर्थ्राइटिस पासून बचाव:

अर्थ्राइटिस हा एक गंभीर आजार आहे. यात हात, पाय, डोळे आणि इतर शरीराच्या भागांवर सूज येते. यामुळे शरीराचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत असतं. मात्र मीठ यापासून तुमचा बचाव करतं. २ कप समुद्री मिठात एक मोठा चमचा द्राक्षाचं तेल टाका आणि त्यात २-४ थेंब इसेन्शिअल ऑईल टाका. या मिश्रणाला गरम पाण्यात टाकून ठेवा आणि हे मिश्रणाचा आंघोळ करताना वापर करा. हा उपाय केल्यामुळे तुम्ही अर्थ्राइटिसपासून स्वतःचं संरक्षण करू शकता, असं जाणकार सांगतात.  

डेड स्किनसाठी फायदेशीर:

पाण्यात मीठ टाकून आंघोळ केल्यामुळे डेड स्किनपासून संरक्षण होतं. मीठ टाकून आंघोळ केल्यामुळे त्वचेत मॅग्नेनेशियमचं प्रमाण संतुलित राहतं. त्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि सुंदर राहते. अर्धा कप मिल्क पावडरमध्ये अर्धा कप ईप्सम सॉल्ट टाका नंतर यात ७-८ थेंब इसेन्शिअल ऑईल टाका. हे मिश्रण आंघोळीच्या पाण्यात टाका. यामुळे तुम्ही डेड स्किनपासून बचाव करू शकता. 

पिंपल्सपासून संरक्षण:

अनेकांना पिंपल्स आणि चेहऱ्यावर असणाऱ्या डागांची समस्या असते. यामुळे आपल्या चेहऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. मात्र आता घाबरायची गरज नाही. एक कप पाण्यात एक चमचा समुद्री मीठ टाका आणि कापसाचा वापर करून हे मिश्रण तुम्ही चेहऱ्याला लावू शकता किंवा हे मिश्रण आंघोळीच्या पाण्यात टाका. यामुळे पिंपल्सपासून तुम्ही तुमचा बचाव करू शकता.

वजन कमी होण्यासाठी मदत:

मीठ आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ केल्यामुळे वजन कमी होण्यासाठी मदत होते. त्यासाठी एक आलं घ्या, त्याचे तुकडे एक चमचा ईप्सम सॉल्टमध्ये टाका. हे मिश्रण आंघोळीच्या पाण्यात टाका. या पाण्यानं आंघोळ केल्यामुळे तुम्ही तुमचं वजन कमी करू शकता. 

रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यात मदत:

आंघोळीच्या गरम पाण्यात मीठ मिसळून आंघोळ केल्यामुळे शरीरात स्फूर्ती टिकून राहतो आणि उत्साह टिकून राहतो, आपल्याला रिफ्रेशींग वाटतं. तसंच या पाण्यानं रोज आंघोळ केल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यात मदत होते. 

म्हणून मीठ फक्त जेवणाची चव वाढवण्यासाठीच नाही तर तुमच्या आरोग्यासाठीही महत्वाचं आहे.

Advantages of bathing by mixing salt in bathing water read all points  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.