पनवेल : पनवेलमधील नेरे भागात राहणाऱ्या एका महिलेला दोन वेगवेगळ्या सायबर टोळ्यांनी शेअर मार्केटमधील गुंतवणूक करून नफ्याचे प्रलोभन दाखवून तब्बल २० लाख ५० हजार रुपयांचा गंडा घातला आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी दोन वेगवेगळ्या सायबर टोळ्यांविरोधात फसवणुकीसह आयटी कायद्यानुसार बुधवारी (ता. २३) गुन्हा दाखल केला आहे. (Advertisement of investment in stock market on Instagram 20 lakhs robbed from woman of Panvel)
यामध्ये फसवणूक झालेली ३४ वर्षीय महिला पनवेलमधील कोप्रोली इथं राहते. या महिलेनं या आधी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले होते. फेब्रुवारी महिन्यांमध्ये त्यांना सोशल मीडियावर शेअर मार्केटच्या माध्यमातून जास्त परतावा मिळवून देण्याची एक जाहिरात आढळली होती. त्यासाठी जाहिरातीमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केले असता त्या एका ग्रुपला जोडल्या गेल्या.
त्यानंतर त्यांच्या मोबाईल क्रमांक व आधार कार्डची माहिती घेऊन त्यांना ५० हजार रुपयांची गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला. त्यांनी पैसेही गुंतवले आणि त्याचा त्यांना परतावाही देण्यात आला. त्या विश्वासावरच त्यांनी अपोलो अकॅडमी या कंपनीवर विश्वास ठेवला आणि नंतर ६ लाख ५० हजारांची गुंतवणूक केली. मात्र, ज्यावेळी ती रक्कम काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मात्र ती रक्कम त्यांना काढता आली नाही.
या घटनेनंतर त्यांना पुन्हा या महिलेच्या इन्स्टाग्रामवर शेअर मार्केटमधील गुंतवणुकीसंदर्भात आणखी एक जाहिरात दिसून आली. त्यामध्ये भरघोस प्रॉफिट मिळण्याबाबतचे प्रलोभन दाखविले होते. तिथेही त्या टोळीने तोच प्रकार वापरून महिलेकडून १४ लाख रुपये उकळले. शेअर मार्केटच्या नावाखाली आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.