... अन् १० वर्षांनंतर दाखल झाला विनयभंगाचा गुन्हा

File Photo
File Photo
Updated on

अंधेरी : गिटार शिक्षकाने १० वर्षांपूर्वी अल्पवयीन मुलीशी अश्‍लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने केलेल्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी राजू ऊर्फ भारत याच्याविरोधात १० वर्षांनी गुन्हा नोंदवला आहे.

अंधेरी परिसरात राहणारी ही मुलगी अल्पवयीन असताना राजू ऊर्फ भारत तिच्या घरी गिटार शिकवण्यासाठी येत असे. घरातील दिवाणखान्यात गिटारची शिकवणी होत असे. काही काळाने मुलीच्या वर्तणुकीत बदल झाल्याचे आईला दिसले. ही मुलगी रात्री बडबडत उठायची, चिडचीड करायची, स्वतःला दुखापत करून घ्यायची. भारत गिटार शिकवण्यासाठी न आल्यास ती खुश असायची. दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतल्यावर लैंगिक शिक्षण मिळाल्यामुळे या मुलीने भारतविषयी सांगण्याचा प्रयत्न केला; मात्र आईने त्याकडे दुर्लक्ष केले.

त्यानंतर गिटार शिकवणी बंद होऊन ही मुलगी अमेरिकेला गेली. तेथे तिची चिडचीड सुरू झाल्यावर मानसोपचार सुरू करण्यात आले. गिटार शिकवताना भारत या मुलीला अनुचित स्पर्श करत होता, तिच्या गुप्तांगात पेन्सिल, पेन, बाटली घालत होता. तिला मोबाईलवर अश्‍लील छायाचित्रे दाखवून कुणालाही न सांगण्याबाबत तो धमकावत होता असे उघड झाले. तिच्या आईने अमेरिकेतून भारतात येऊन ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीची शहानिशा करून गिटार शिक्षक भारत याच्यावर भारतीय दंड संहितेमधील कलम क्र. ३५४, ५०६ व ५०९ नुसार गुन्हा दाखल केला.

लवकरच कारवाई
विनयभंग झालेली मुलगी आता २२ वर्षांची आहे. ती १० ते १३ वर्षांची असताना राजू ऊर्फ भारत या गिटार शिक्षकाने तिच्याशी अश्‍लील चाळे केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच संबंधित शिक्षकावर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

After 10 years, FIR registered of Breach of modesty

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.